शेल्टर् २०२२ : पहिल्या दोनच दिवसात प्रदर्शनात १५ हजार हून अधिक दर्शकानी दिली भेट 

८० फ्लॅट्स ची झाली नोंदणी 

0

नाशिक,२५ नोव्हेंबर २०२२ – कोविड नंतर मोठ्या घरांच्या मागणी मध्ये झालेली वाढ तसेच नाशिक मध्ये भविष्यात येऊ घातलेल्या अनेक व्यवसाय व उद्योग संधी मुळे नाशिक मध्ये रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीचा कल वाढला असल्याचे दृश्य क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर् 2022 या गृह प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसात दिसून येत आहे.

पहिल्या दोनच दिवसात प्रदर्शनात सुमारे १५००० हून अधिक दर्शकानी भेट दिली असून ८० फ्लॅट्स ची नोंदणी झाली असून उद्या शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांचे औचित्य साधून अनेकांनी साईट विझिट चे नियोजन देखील केले आहे . अर्थव्यवस्था पूर्व पदावर येत असल्याचे हे चांगले संकेत असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले.

आज सुट्टीचा दिवस नसून देखील असंख्य नाशिककर तसेच अन्य शहरे जसे धुळे , नंदुरबार , जळगाव , ठाणे , औरंगाबाद येथून देखील दर्शक प्रदर्शन बघण्यासाठी येत असून विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा’ नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात भविष्यातील नाशिक कसे असेल याचा अनुभव घेत आहे . असेही त्यांनी नमूद केले.

बांधकाम उद्योगास देशाच्या जी डी पी मध्ये महत्वाचे स्थान असून प्रत्येक शहरातील अर्थचक्र फिरण्यामध्ये देखील बांधकाम उद्योगाची मोलाची भूमिका आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तसेच कुशल आणि अकुशल प्रकारचा रोजगार देखील बांधकाम व्यवसायातून उपलब्ध होतो. त्यामुळे 100 हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प एकच छताखाली उपलब्ध असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकूणच शहराचे अर्थचक्र फिरण्यास गती मिळेल असा विश्वास प्रदर्शनाचे समन्वयक कृणाल पाटील यांनी व्यक्त केला ..

सदनिकांशिवय बांधकाम साहित्य , इंटेरिअर साठी लागणारे विविध साहित्य तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकां चे स्टॉल्स देखील येथे आहेत शहराचा उत्सव असलेल्या या प्रदर्शनात हॅप्पी स्ट्रीट मधील स्थानिक कलाकारांचे सादरीकरणाने आलेल्या दर्शकांचे मनोरंजन केले. या निमित्ताने स्थानिक कलावंतांना कला गुण प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे..व्यवसाय शिवाय अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर मध्ये देखील अनेक सामाजिक संस्थांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहे .

प्रदर्शनास मोफत प्रवेश
शेल्टर प्रदर्शनास भेट देण्यासाठी दर्शकांना ऑनलाईन नोंदणी केल्यास मोफत प्रवेश देण्याचे क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे जाहीर करण्यात आले आहे. या साठी फक्त क्यु आर कोड स्कॅन करून आपली माहिती भरल्यास एन्ट्री पास त्या दर्शकाच्या मेल वर येईल . या आधी अश्या ऑनलाईन नोंदणीची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत होती पण त्याची मागणी बघता ही मुदत प्रदर्शन कालावधीपर्यंत म्हणजे २८ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. डिजिटल इंडिया च्या प्रवासात खारीचा वाटा तसेच दर्शकांना भेट प्रदर्शनास भेट देणे अधिक सुकर व्हावे या साठी म्हणून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रदर्शनास भेट देणाऱ्या दर्शकातून रोज काही भाग्यवंत लकी ड्रॉ द्वारे निवडले जातात.
२४ तारखेच्या लकी ड्रॉ चे भाग्यवान विजेते असे –
1) राजा शेख – सोनाली पैठणी व डिनर सेट
2) सुमित चौधरी -मुहूर्त डिझायनर स्टुडिओ गिफ्ट व्हॉउचर व एमराल्ड पार्कचे फूड कुपन
3) प्रफुल्ल पाटील -मयूर अलंकार तर्फे १ ग्रॅम सोन्याचे नाणे व एमराल्ड पार्कचे फूड कुपन
4) प्रतिक देवरे – सोनाली पैठणी व डिनर सेट
5) योगेश लोखंडे -मयूर अलंकार तर्फे १ ग्रॅम सोन्याचे नाणे व एमराल्ड पार्कचे फूड कुपन

शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [ घटना ] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत.

नाशिक ची देशातील सर्वोत्तम शैक्षणिक हब कडे वाटचाल जे एल एल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो च्या पाहणी  अहवालातील निष्कर्ष 
शहरात उपलब्ध अनेक संधी,  सामाजिक व सांस्कृतिक समरसता तसेच  आर्थिक समतोल या मुळे  नाशिक हे देशातील आणि जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी  पसंतीचे ठिकाण बनत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. जगप्रसिद्ध सल्लागार संस्था जे एल एल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो  द्वारे  संयुक्त रित्या केल्या गेलेल्या ‘ फाईनएस्ट  एज्युकेशन हब ऑफ इंडिया’  या विषयावरील पाहणी अहवाल आज शेल्टर च्या उद्घाटन समारंभात  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  प्रकाशित करण्यात आला.  नाशिक चे  हवामान, मुबलक पाणी ,भारतातील आघाडीच्या शहरांपेक्षा कमी प्रदूषण पातळी, तेथील सुंदर नैसर्गिक लँडस्केप आणि परवडणारे राहणीमान यामुळे ते भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहरांपैकी एक बनले आहे.

या सर्वेक्षणाबाबत बोलताना क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की एज्युकेशन हब म्हणून विकसित होण्यासाठी नाशिककडे योग्य घटक आहेत. एक उदयोन्मुख नॉलेज हब म्हणून शहरामध्ये प्रचंड क्षमता असताना, हबला चालना देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ज्ञानाचे पोषण करणारी इकोसिस्टम तयार करणे महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे, शहराने देऊ केलेल्या शिक्षणाच्या शक्यता आणि सुविधा सर्वोच्च क्रमाच्या असाव्यात. समांतर, आर्थिक परिस्थिती आणि स्थानिक आकांक्षा यांच्याशी सुसंगत असलेल्या काही विशिष्ट संस्था देखील विकसित केल्या पाहिजेत.

जे एल एल चे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक करण सिंग सोडी, यांनी सांगितले की   देशाला सामर्थ्यवान बनण्यासाठी दर्जेदार आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची निर्मिती यामुळे देशाच्या अर्थकारणात सकारात्मक बदल होणार आहेत. या दर्जेदार शिक्षणासाठी परदेशातून असंख्य विद्यार्थी देशात येऊ शकतात. यामुळे देशाच्या आर्थिक विकासात अश्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठे याचे जाळे तयार होणे आवश्यक आहे.. 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात एकूण 38.5 दशलक्ष विद्यार्थी असल्याचा अंदाज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टां प्रमाणे वर्ष 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये हीचं नोंदणी संख्या  दुप्पट होईल असे लक्ष्य आहे.  ही उच्च शिक्षण देणाऱ्या  शैक्षणिक संस्थांसाठी मोठ्या संधी असल्याचे  .

देशातील विद्यमान शिक्षण केंद्रे आपल्या मोठ्या युवा लोकसंख्येला कौशल्य आणि शिक्षित करण्यासाठी पुरेसे नाहीत. मागणीतील ही मोठी तफावत दूर करण्यासाठी, सध्याचा अभ्यास नवीन नवीन शैक्षणिक हब तयार करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करतो, जसे की नाशिक, जे देशांतर्गत तसेच परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी उदयोन्मुख शिक्षण केंद्रासाठी एक संभाव्य गंतव्यस्थान आहे.

नाशिकला कृषी-व्यवसाय, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल, संरक्षण, फार्मास्युटिकल्स आणि टेक्सटाईल यासह इतरांसाठी पारंपारिक औद्योगिक पायाचा पाठिंबा आहे आणि ते नाविन्यपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे. याशिवाय, 350 एकरच्या आयटी पार्कची योजना आखण्यात आली आहे ज्यामुळे कुशल संसाधनांची मागणी निर्माण होईल. हे शहर रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चांगले जोडलेले आहे, विद्यापीठ परिसर विकसित करण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध आहे. नाशिक मधील अनेक बाबी शैक्षणीक हब साठी पोषक असून  वाढत्या मूलभूत सोयीच्या पूर्तता करण्यासाठी क्रेडाई सक्षम असल्याचे  प्रतिपादन  क्रेडाई राष्ट्रीय चे  उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी केले .

उच्च शिक्षण देशाच्या कर्मचार्‍यांची रोजगारक्षमता वाढविण्यात आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात थेट योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारत एक ज्ञान अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, तरुण भारतीयांची वाढती संख्या उच्च शिक्षणाची आकांक्षा बाळगण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणातील GER गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण भारतामध्ये लक्षणीयरीत्या वाढला आहे, 2011-12 मध्ये 20.8% वरून 2018-19 मध्ये 26.3% पर्यंत. 2035 पर्यंत उच्च शिक्षणातील GER (व्यावसायिक शिक्षणासह) 50% पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

“नाशिकमध्ये  गेल्या काही वर्षांत 220 उच्च शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या  आहेत, ज्या खाजगी क्षेत्राच्या पुढाकारामुळे दर्जेदार शैक्षणिक संस्था स्थापन करणे शक्य झाले आहे. नाशिकमधील उच्च शिक्षणाचा GER सध्या 35.7 वर आहे आणि येत्या काही वर्षांत ते शिक्षण केंद्र म्हणून उदयास येत असल्याने जलद प्रगतीची क्षमता प्रदान करते,असे गौरव ठक्कर, मानद सचिव, क्रेडाई नाशिक मेट्रो यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!