शेल्टर २०२२ : नाशिकमध्ये सुनियोजित विकासाच्या अपरिमित संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पहिल्याच दिवशी सदनिका बुकिंगची झाली सुरुवात
नाशिक,२४ नोव्हेंबर २०२२ – रिअल इस्टेट उद्योग हे रोजगार निर्मिती करण्यात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र असून नाशिकमध्येही सुनियोजित विकासाच्या अपरिमित संधी आहेत. युनिफाईड डीसीपीआर लागू झाल्यापासून बांधकाम क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असून त्याचा लाभ ग्राहक व विकासक या दोघांनाही झाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे आयोजित शेल्टर या गृहप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभास नाशिकचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, खा. हेमंत गोडसे, मनपा आयुक्त डॉ सी एल पुलकुंडवार, क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, महाराष्ट्र क्रेडाई चे अध्यक्ष सुनील फुरदे, महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, मानद सचिव गौरव ठक्कर, शेल्टरचे समन्वयक कृणाल पाटील, ललित रूंग्ठा, ईशा चंदे, जे एल एल चे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक करण सिंग सोडी हे मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, सर्वांच्या हिताचे निर्णय त्वरित घेण्यासाठी शासन अग्रक्रमाने काम करीत असून प्रलंबित मुद्द्यांवर पण लवकरच निर्णय घेण्यात येईल नाशिक पुणे रेल्वे मार्ग, आऊटर रिंग रोड असे असे नाशिकच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पास देखील गती देण्यात येईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते “नाशिक फाईनेस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया” या सर्व्हेचे अनावरण करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित पालकमंत्री दादासाहेब भुसे म्हणाले की येत्या काळात सर्व घटकांना एकत्र करून शहराच्या विकासाचा एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्यासाठी सर्व संबंधित विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या आराखड्यासाठी क्रेडाई ने सहकार्य करावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. प्रस्तावित आऊटर रिंग रोड साठी हैदराबाद च्या बाहेरील विकसित झालेल्या रिंगरोड चा देखील अभ्यास करण्याचे त्यांनी सूतोवाच केले.
या प्रसंगी उपस्थित खा. हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना नाशिक च्या पुढील विकासाच्या रोड मॅप मधील मुद्दे मांडले. ते म्हणाले की जलद भूसंपादनासाठी एकास पाच टीडी आर , रिडेव्हप्लमेंट च्या नियमात सुसूत्रता, त्वरित बिना अडथळा बांधकाम परवानग्या, नवीन हवाई मार्ग यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असून लवकरच त्याबाबत सकारात्मक माहिती येईल असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या भाषणात मनपा आयुक्त डॉ. सी एल पुलकुंडवार म्हणाले की, नाशिकच्या अर्थव्यवस्थेला शेल्टर मुळे चालना मिळेल. राज्यात सर्वात अधिक ऑनलाईन बांधकाम परवानग्या नाशिक महानगरपालिकेने दिल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या नियमावलीचा अभ्यास करून एक रिपोर्ट लवकरच सादर करण्यात येणार असून या आधारे एक आदर्श सिस्टीम देण्यात येईल.
या वेळी सर्वांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवि महाजन म्हणाले की ’ विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा’ नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या घातलेल्या अनेक नवीन योजना आणि प्रकल्पामुळे नाशिक मध्ये आज रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात नक्की फायदेशीर ठरणार आहे., बांधकाम उद्योगास देशाच्या जी डी पी मध्ये महत्वाचे स्थान असून प्रत्येक शहरातील अर्थचक्र फिरण्यामध्ये देखील बांधकाम उद्योगाची मोलाची भूमिका आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तसेच कुशल आणि अकुशल प्रकारचा रोजगार देखील बांधकाम व्यवसायातून उपलब्ध होतो. नाशिक मध्ये अनेक मोठ्या उद्योग व्यवसायाच्या संधी येत असून भविष्यात अन्य शहरातून असंख्य नागरिक नाशिक मध्ये येतील . मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिक ची वाढ ही नियोजनबद्ध असून तुलनेने घरांचे दर कमी आहेत त्यामुळे आज नाशिक मधील रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक निशित भविष्यात लाभदायक ठरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी बांधकाम परवानग्यासाठी ऑनलाईन सोफ्टवेअर च्या अडचणी दूर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतांना समृद्धी महामार्गाला नाशिक ने प्रभावीपणे जोडावे तसेच रोयल्टीचे नियम सुटसुटीत करावे अशी मागणीही केली.
राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर म्हणाले की, शहराच्या बाहेरील भागात पण विकास व्हावा यासाठी क्रेडाई प्रयत्नशील असून ज्या चुका अन्य शहराच्या विकासात झाल्या त्या नाशिकच्या विकासादरम्यान टाळणे गरजेचे आहे. नाशिकला वेलनेस, फायनान्शियल, शैक्षणिक, सांस्कृतिक व हेरिटेज या पंचसूत्री वर आधारित विकास करण्यासाठी शासनाने श्वेतपत्रिका काढावी अशी विनंती.
शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की महाराष्ट्राच्या गृह प्रदर्शनाच्या इतिहासत शेल्टर २०२२ हे प्रदर्शन सर्वात भव्य म्हणून ओळखले जाईल .या मध्ये १०० हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प, बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांसह एकाच छताखाली असून ग्राहकास निर्णय घेण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण सध्या आहे. करोना नंतर मोठ्या घराच्या मागणीत प्रचंड वाढ आली असून ती मागणी पूर्ण करण्यासाठी बांधकाम व्यवसायिक सज्ज आहेत . शेल्टर हा शहराचा गृह स्वप्न पूर्ती उत्सव आहे असून येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अनुभवण्यासाठी येथे नक्की भेट द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.
शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [ घटना ] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत
प्रदर्शनास मोफत प्रवेश
शेल्टर प्रदर्शनास भेट देण्यासाठी दर्शकांना ऑनलाईन नोंदणी केल्यास मोफत प्रवेश देण्याचे क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे जाहीर करण्यात आले आहे. या साठी फक्त क्यु आर कोड स्कॅन करून आपली माहिती भरल्यास एन्ट्री पास त्या दर्शकाच्या मेल वर येईल . या आधी अश्या ऑनलाईन नोंदणीची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत होती पण त्याची मागणी बघता त्याची मुदत प्रदर्शन कालावधीपर्यंत म्हणजे २८ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. डिजिटल इंडिया च्या प्रवासात खारीचा वाटा तसेच दर्शकांना भेट प्रदर्शनास भेट देणे अधिक सुकर व्हावे या साठी म्हणून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक ची देशातील सर्वोत्तम शैक्षणिक हब कडे वाटचाल जे एल एल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो च्या पाहणी अहवालातील निष्कर्ष
नाशिक शहरात उपलब्ध अनेक संधी, सामाजिक व सांस्कृतिक समरसता तसेच आर्थिक समतोल या मुळे नाशिक हे देशातील आणि जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी पसंतीचे ठिकाण बनत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. जगप्रसिद्ध सल्लागार संस्था जे एल एल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे संयुक्त रित्या केल्या गेलेल्या ‘ फाईनएस्ट एज्युकेशन हब ऑफ इंडिया’ या विषयावरील पाहणी अहवाल आज शेल्टर च्या उद्घाटन समारंभात प्रकाशित करण्यात आला. नाशिक चे हवामान, मुबलक पाणी ,भारतातील आघाडीच्या शहरांपेक्षा कमी प्रदूषण पातळी, तेथील सुंदर नैसर्गिक लँडस्केप आणि परवडणारे राहणीमान यामुळे ते भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहरांपैकी एक बनले आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की एज्युकेशन हब म्हणून विकसित होण्यासाठी नाशिककडे योग्य घटक आहेत. एक उदयोन्मुख नॉलेज हब म्हणून शहरामध्ये प्रचंड क्षमता असताना, हबला चालना देण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ज्ञानाचे पोषण करणारी इकोसिस्टम तयार करणे महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे, शहराने देऊ केलेल्या शिक्षणाच्या शक्यता आणि सुविधा सर्वोच्च क्रमाच्या असाव्यात. समांतर, आर्थिक परिस्थिती आणि स्थानिक आकांक्षा यांच्याशी सुसंगत असलेल्या काही विशिष्ट संस्था देखील विकसित केल्या पाहिजेत.
जे एल एल चे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालक करण सिंग सोडी, यांनी सांगितले की देशाला सामर्थ्यवान बनण्यासाठी दर्जेदार आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची निर्मिती यामुळे देशाच्या अर्थकारणात सकारात्मक बदल होणार आहेत. या दर्जेदार शिक्षणासाठी परदेशातून असंख्य विद्यार्थी देशात येऊ शकतात. यामुळे देशाच्या आर्थिक विकासात अश्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठे याचे जाळे तयार होणे आवश्यक आहे.. 2019-20 मध्ये उच्च शिक्षणात एकूण 38.5 दशलक्ष विद्यार्थी असल्याचा अंदाज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टां प्रमाणे वर्ष 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये हीचं नोंदणी संख्या दुप्पट होईल असे लक्ष्य आहे.
देशातील विद्यमान शिक्षण केंद्रे आपल्या मोठ्या युवा लोकसंख्येला कौशल्य आणि शिक्षित करण्यासाठी पुरेसे नाहीत. मागणीतील ही मोठी तफावत दूर करण्यासाठी, सध्याचा अभ्यास नवीन नवीन शैक्षणिक हब तयार करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करतो, जसे की नाशिक, जे देशांतर्गत तसेच परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी उदयोन्मुख शिक्षण केंद्रासाठी एक संभाव्य गंतव्यस्थान आहे.
नाशिकला कृषी-व्यवसाय, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल, संरक्षण, फार्मास्युटिकल्स आणि टेक्सटाईल यासह इतरांसाठी पारंपारिक औद्योगिक पायाचा पाठिंबा आहे आणि ते नाविन्यपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे. याशिवाय, 350 एकरच्या आयटी पार्कची योजना आखण्यात आली आहे ज्यामुळे कुशल संसाधनांची मागणी निर्माण होईल. हे शहर रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चांगले जोडलेले आहे, विद्यापीठ परिसर विकसित करण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध आहे. नाशिक मधील अनेक बाबी शैक्षणीक हब साठी पोषक असून वाढत्या मूलभूत सोयीच्या पूर्तता करण्यासाठी क्रेडाई सक्षम असल्याचे प्रतिपादन क्रेडाई राष्ट्रीय चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी केले .
उच्च शिक्षण देशाच्या कर्मचार्यांची रोजगारक्षमता वाढविण्यात आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात थेट योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारत एक ज्ञान अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, तरुण भारतीयांची वाढती संख्या उच्च शिक्षणाची आकांक्षा बाळगण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणातील GER गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण भारतामध्ये लक्षणीयरीत्या वाढला आहे,2011-12 मध्ये 20.8% वरून 2018-19 मध्ये 26.3% पर्यंत. 2035 पर्यंत उच्च शिक्षणातील GER (व्यावसायिक शिक्षणासह) 50% पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
“नाशिकने गेल्या काही वर्षांत 220 उच्च शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आहेत, ज्या खाजगी क्षेत्राच्या पुढाकारामुळे दर्जेदार शैक्षणिक संस्था स्थापन करणे शक्य झाले आहे. नाशिकमधील उच्च शिक्षणाचा GER सध्या 35.7 वर आहे आणि येत्या काही वर्षांत ते शिक्षण केंद्र म्हणून उदयास येत असल्याने जलद प्रगतीची क्षमता प्रदान करते,असे गौरव ठक्कर, मानद सचिव, क्रेडाई नाशिक मेट्रो यांनी सांगितले.