नाशिक,दि,२३ डिसेंबर २०२४ -शेल्टर 2024 ने प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसातच अनेक उच्चांक गाठले असून या चार दिवसात सुमारे 9000 ,( नऊ हजार) कुटुंबांनी प्रदर्शनास भेट दिली असून सुमारे 60 बुकिंग झाले आहेत . याच सोबत प्लॉट्स तसेच बांधकामाला लागणाऱ्या अन्य साहित्यांच्या स्टॉलवर पण सकारात्मक प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. प्रदर्शनाचे आज २४ व उद्या २५ असे शेवटचे दोनच दिवस उरले असून प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले.
प्रदर्शन स्थळाची भव्यता
सहभागी विकासकांच्या प्रॉपर्टी ची संख्या आणि त्यांना मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद या व अशा अनेक विविध बाबींमुळे त्रंबक रोडवरील पीटीसी समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर 2024 हे अनेक अर्थाने आगळे वेगळे ठरत आहे. पहिल्यांदाच प्रदर्शन सहा दिवस या कालावधी साठी आयोजित केले असून ठक्कर इस्टेट येथे सुमारे तेरा एकर एवढ्या भव्य जागेत आंतरराष्ट्रीय स्तराला साजेसे अशा या प्रदर्शनाची उभारणी केली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
शांत व प्रगतीशील नाशिकमध्ये आपले घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. रियली ईस्टेट मधील गुंतवणूक म्हणजे स्वप्नपूर्ती आणि गुंतवणूक असा दुहेरी लाभाचा संगम असतो. या साठी प्राधान्याने प्रगतिशील नाशिकची निवड केली जाते.चांगले वातावरण तसेच कमी प्रदूषण असणाऱ्या नाशिकमध्ये विविध क्षेत्रात अनेक संधी आहेत तसेच कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे अनेकांच्या पसंतीचे नाशिक हे शहर झाले आहे. या मुळे नाशिक मधील रियल इस्टेट क्षेत्रातील अनेक पर्यायांची माहिती सुलभ पणे मिळण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरतं असल्याचे शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले.
बांधकाम व्यावसायिकाचे शहराचे अर्थकारण व शप्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगार हे बांधकाम व्यावसायिकांतर्फे मोठ्या प्रमाण दिला जातो. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितले जात असल्याचे शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले.प्रदर्शनासाठी नाशिक सोबतच मालेगाव ,धुळे मनमाड, जळगाव, ठाणे व मुंबई येथून देखील नागरिक घेत असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सातत्याने नाशिक ब्रँडिंग साठी केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य होत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
या प्रदर्शनात अगदी 15 लाखापासून 5 कोटी पर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन, औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर, बांधकाम साहित्य, नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान, सुरक्षा साहित्य, गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकच छताखाली उपलब्ध असून या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शेल्टर -2024 चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी सांगितले .
सेमिनार ला उत्स्फूर्त प्रतिसाद
यशस्वी होण्यासाठी प्रतिमा व्यवस्थापन या विषयावर झालेल्या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यासाठी वक्ता म्हणून निधी वैश्य होत्या. त्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात मार्केटिंग चे महत्व यावर मार्गदर्शन सत्र झाले .यावेळी नितीन पाटील व बी .एम .काळे यांनी मार्गदर्शन केले.
२४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता दस्तऐवज आणि स्वाक्षरींचे प्रमाणीकरण या विषयावर परेश चिटणीस यांचे मार्गदर्शन होईल
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.