राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान – बोमन इराणी 

शेल्टर २०२४ चा समारोप :१५००० कुटुंबांची भेट १०० हून अधिक बुकिंग 

0

नाशिक,दि,२५ डिसेंबर २०२४ –जगातील अनेक आघाडीच्या शहरांच्या उभारणी व प्रगती मध्ये रियल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर उद्योगाचा मोठा हात आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देखील देशातील विविध शहरांत कार्यरत क्रेडाई च्या सभासदांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय क्रेडाई चे अध्यक्ष बोमन इराणी यांनी केले.

२० ते २५ डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे शेल्टर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाने, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते ,क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील,शेल्टर -2024 चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर -2024 चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर, अविनाश शिरोडे, विजय संकलेचा, सुरेश अण्णा पाटील, सुनिल भाय भंग , किरण चव्हाण, उमेश वानखेडे, रवी महाजन हे मान्यवर उपस्थित होते.
बोमन इराणी पुढे म्हणाले की, प्रत्येकाचे स्वप्न आणि आठवणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये बांधकाम व्यवसायिकांची मोलाची भूमिका असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित शेल्टर 2024 या प्रदर्शनाची मांडणी अत्यंत विचारपूर्वक केली आहे. बांधकाम उद्योग हे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र असून शाश्वत विकासाची कास धरणे गरजेचे आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकला उज्वल भविष्य असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाने –
निसर्गाने भरभरून दिलेल्या नाशिकची देशात आपली एक वेगळी ओळख असून दर 12 वर्षांनी नाशिक मध्ये भरणारा कुंभमेळा हा विकासाची कवाडे उघडतो. नाशिकच्या शाश्वत विकासासाठी शासन सकारात्मक असून आगामी काळात नाशिक व परिसरात अनेक नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू होईल. नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी वाहतुकीचे पूर्वनियोजन तसेच नाशिक शहर व सभोवतालच्या परिसराचा समग्र विकासाचा विचार आवश्यक. शहर सौंदर्यासाठी प्रयत्न करताना शहरातील विविध जागांचे सुनियोजन करावे.

अजय बोरस्ते शिवसेना उपनेते –
क्रेडाई ने नाशिकचे ब्रॅण्डिंग सर्वदूर केले असून नाशिकच्या विकासासाठी सकारात्मक विचार करणारे शासन आहे. लवकरच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नाशिक साठी एका बैठकीचे नियोजन करून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार.

“शेल्टर प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात मार्च २०२५ पर्यंत -कृणाल पाटील
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले भविष्यातील नाशिक घडवण्यामागे क्रेडाई च्या सर्व माजी अध्यक्ष आणि सदस्य असलेल्या सर्व बांधकाम व्यवसायिकांचा मोलाचा वाटा आहे. या प्रदर्शनानंतर नाशिकची स्कायलाइन झपाट्याने बदलत आहे याची प्रकर्षाने जाणीव होत आहे. कधीकाळी टुमदार बंगल्यांचे शहर असलेले नाशिक आता 40 हून अधिक मजल्यांची इमारत असलेले शहर होत आहे. या इमारतींमध्ये असलेल्या सुविधा या ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आवडीनिवडी यांचे प्रतिबिंब आहे . या प्रमाणे 1, 2 व 3 BHK सोबत स्टुडिओ अपार्टमेंट ते 8 BHK सदनिका निवासी व औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सीनियर सिटीजन हाऊसिंग असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लॉजिस्टिक्स सेवा तसेच विविध क्षेत्रात अनेक नवीन ब्रँड्स नाशिकमध्ये येत आहेत. अन्य शहराच्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये प्रॉपर्टी चे भाव तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्यामुळे तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असल्याने नाशिक बाहेरील शहरातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नाशिकची प्राधान्याने निवड करत आहेत.यासोबतच शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने नाशिक मध्ये येणाऱ्या असंख्य नागरिकांची नाशिकमध्ये आपले घर घेऊन स्थायिक होण्याकडे कल असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. नाशिक ची वाढ ऑरगॅनिक वाढ असून शेल्टर प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपात मार्च पर्यंत करणार असल्याची घोषणा पण त्यांनी केली .

Shelter 2024/Valuable place of construction professional in nation building - Boman Irani

१५००० कुटुंबांची भेट …१०० हून अधिक बुकिंग – गौरव ठक्कर
गेल्या ६ दिवसात १५००० कुटुंबांची भेट दिली असून १०० हून अधिक बुकिंग यात झाले आहे. ते पुढे म्हणाले की मोठ्या जागेमुळे हे प्रदर्शन अतिशय ऐसपैस होते .स्टॉलचा आकार तसेच स्टॉलच्या दोन रांगातील अंतर देखील प्रशस्त होते. यामुळे एकाच वेळेस शेकडो नागरिक प्रदर्शन स्थळी असून देखील नागरिकांना तसेच बांधकाम व्यवसायिकांना एक दुसऱ्याशी व्यवस्थित संवाद साधता आला . सर्वसमावेशक मार्केटिंग प्लॅन मुळे नाशिक आणि शेल्टर चे ब्रॅण्डिंग सर्वदूर करता आले. प्रदर्शनाचा लेआउट युवा वास्तु विशारद आर्कि. दिप्ती पाटील, आर्कि. ऋग्वेद जायखेडकर,आर्कि. कपिल साबळे यांनी वरिष्ठ वास्तुविशारद मिहिर मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली केला. दर दोन वर्षांनी होणारे शेल्टर हे प्रदर्शन मागील प्रदर्शनापेक्षा अधिक उत्कृष्ठ करण्याचा आमचा मानस या शेल्टर च्या यशाने सफल झाला असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

आरंभी स्वागत सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी केले.  शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले..मनोज खिंवसरा यांनी आभार मानले .

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड यांनी विशेष सहकार्य केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.