क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर गृह्प्रदर्शनाचा २४ नोव्हेंबर पासून शुभारंभ
एक्स्पोमध्ये १०० बिल्डर चे ५०० हून अधिक प्रकल्प : बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्थाचा सहभाग
महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन ठरणार: विविध जिल्ह्यांतील आणि देशातील प्रेक्षक राहणार उपस्थित
नाशिक,१३ नोव्हेंबर २०२२ –आपले घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे सोबतच प्रगतीशील नाशिक मध्ये उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे गृह प्रदर्शन क्रेडाई शेल्टर चे आयोजन गंगापूर रोड वरील डोंगरे वस्ती गृह मैदान येथे २४ ते 2२८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होत आहे .’ विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा’ नाशिक नेक्स्ट’ या संक्ल्पेनेवर आधारित या प्रदर्शनात 100 हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांसह एकाच छताखाली असतील . हे ५ दिवसीय प्रदर्शन खऱ्या अर्थाने राज्यातील सर्वात भव्य गृह प्रदर्शन असून या प्रदर्शनास सुमारे १ लाखाहून अधिक दर्शक भेट देतील असा विश्वास क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी व्यक्त केला .
शेल्टर मुळे ग्राहकांना नाशिक तसेच सिन्नर, दिंडोरी, धुळे, जळगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी सुरू असलेले अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळेल, ज्यात बजेट प्रॉपर्टी ते परवडणारी घरे ते अगदी पॉश अपस्केल डायनॅमिक लक्झरी प्रकल्प आहेत. या सोबत प्लॉट , फार्म हाउस , व्यवसायिक , शोप्स याचे देखील असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत ..या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल, टाइलिंग, प्लंबिंग, कंत्राटदार, खिडक्या, काच, , सोलर, बांधकाम साहित्य ,लिफ्ट, सिक्युरीटी सिस्टम याची देखील प्रदर्शनात माहिती मिळेल
रवी महाजन पुढे म्हणाले की सद्यस्थितीत हवामान , उद्योग आणि शिक्षण सुविधा यामुळे नाशिक हे हॉट फेवरेट डेस्टिनेशन आहे. तसेच येऊ घातलेल्या अनेक नवीन योजना आणि प्रकल्पामुळे नाशिक मध्ये आज रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात नक्की फायदे का सौदा ठरणार आहे. निर्माणाधीन चेन्नई-सुरत एक्स्प्रेस वे नाशिकला दक्षिणेशी जोडण्यासाठी आणि गुजरातच्या इको-हब असलेल्या सुरतशी नाशिकची जवळीक निर्माण करण्यासाठी एक प्रवेशद्वार असेल तसेच ३५०० कोटींचा रिलायन्स लाइफ सायन्स प्रकल्प, इंडिअन ओईल प्रकल्प, अनेक नवे हॉस्पिटल्स , शैक्षणिक संस्था या मुळे देखील रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी शहरात उपलब्ध होणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले
प्रदर्शनाच्या विशेषता बाबत अधिक माहिती देताना शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील, म्हणाले की हे प्रदर्शन अनेक अंगाने महाराष्ट्रातील सर्वात भव्य प्रोपर्टी प्रदर्शन आहे . शेल्टर १.५ लाख+ चौरस फूट पॅव्हेलियन एवढ्या विस्तीर्ण जागेत पसरले असून हे पूर्णपणे पेपरलेस आहे. एक्स्पोमध्ये स्वतंत्र बिझनेस लाउंज आणि समर्पित नेटवर्किंग पॉड्स देखील असतील जिथे ग्राहक प्रदर्शकांशी संवाद साधू शकतात. याव्यतिरिक्त, विशेष ऑफर, लकी ड्रॉ आणि जिंकण्यासाठी आकर्षक स्पॉट बक्षिसे देखील असतील. त्याच शिवाय हैप्पी स्ट्रीट चे आयोजन देखील प्रदर्शन स्थळी करण्यात येईल २२ नोवेबेर पर्यंत ओंनलाईन नोंदणी करणाऱ्यास प्रदर्शनासाठी कोणतेही प्रवेश शुल्क लागणार नसून शिवाय अनेक आकर्षक स्कीम आणि ऑफर देखील येथे देण्यात येत आहेत . क्रेडाई नाशिक मेट्रोनेही सोय लक्षात घेऊन नाशिकच्या महत्त्वाच्या ठिकाणांहून वाहतूक व्यवस्था केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले .
कोविड नंतर, मोठ्या घरांची मागणी वाढली असून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. अश्या वेळेस एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध झाल्याने हे प्रदर्शन निशितच यशस्वी होईल असेही कृणाल पाटील यांनी नमूद केले .
दृष्टीक्षेपात शेल्टर २०२२
१. एक्स्पोमध्ये १०० बिल्डर चे ५०० हून अधिक प्रकल्प
२. बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्थाचा सहभाग
३. जागतिक दर्जाच्या सुविधा
४. नाशिक मधील सर्वप्रथम लेगसी वाल
५. २१ नोव्हेंबर पर्यंत ओंनलाईन नोंदणी केल्यास प्रवेश मोफत
६. प्रदर्शनास भेट देणार्यामधून दहा लकी ड्रो विजेता आणि एक बम्पर बक्षिस
७. लहान मुलांसाठी प्ले एरिया आणि फन झोन
८. रोज हैप्पी स्ट्रीट मध्ये स्थानिक कलाकारंसह संगीत आणि फन फेअर
२४ नोव्हेंबर पासून गंगापूर रोड वरील डोंगरे वस्ती गृह मैदानात सुरु होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर गृह्प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्य कार्यरत आहेत .