शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ 

0

मुंबई – गेल्या वर्षी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याच्या पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत.पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगची चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे. ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.

या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी २०२१ मध्ये अटक केली होती.परंतु सध्या राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेल्या सर्व माहितीच्या अभ्यासानंतरच गेल्या आठवड्यातच आता ईडीनं राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पॉर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड’ नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती.त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे.

त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.