मुंबई,दि. १२ ऑक्टोबर २०२३ – शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी आज सुनावणी होणार आहे. वेळापत्रकानुसार हि सुनावणी उद्या १३ ऑक्टोबरला होणार होती.परंतु जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला जाणार असल्याने आज दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे. पण याच प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने बदललेल्या वेळापत्रकावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.
शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणी दिवसेंदिवस लांबत चालली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलं सुनावल देखील होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे. १३ ऑक्टोबर रोजी शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही सुनावणी आज होणार आहे. शिवसेना अपात्रतेसंबंधी एकूण ४० याचिका विधानसभा अध्यक्षांच्या समोर आहेत. या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रते संदर्भात नबाम रेबिया केस लँडमार्क जजमेंट असून माझा निर्णय महाराष्ट्राला न्याय देणारा असेल अशी प्रतिक्रिया विधाससभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे.आमदार अपात्रतेच्या संदर्भात १२ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे.२३ नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे.