सुडबुद्धीचे राजकारण नाशिककर खपवून घेणार नाहीत-सुधाकर बडगुजर

राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचे शानदार उद्घाटन

0

नाशिक,दि,११ मे २०२४ –राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्याचे कार्य सुरू झाले आहे.परंतु नाशिकची जनता सुज्ञ आहे.या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्याचा चंग सर्वांनी बांधला असून वाजेंचा विजय हा काळ्या दगडावरची रेष असल्याचे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ (पराग ) वाजे यांच्या मध्य नाशकातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या  उपस्थितीत शालिमार चौकात संपन्न झाले त्यावेळी बडगुजर बोलत होते.

राज्यातील सिंचन घोटाळ्यात ज्यांचे नाव आले त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपाने भ्रष्टाचाऱ्यांना चरण्याचे कुरण मोकळे करून दिले आहे.५० खोके एकदम ओके असा आरोप ज्यांच्यावर होतो त्यांना तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवून भाजपाने देशवासीयांना काय संदेश देण्याचा प्रयत्न केला याचे कोडेच उलगडत नाही.भ्रष्टाचार करा नंतर भाजपाला समर्थन देऊन मोठी पदे उपभोगा असे अप्रत्यक्षरीत्या सुचविणाऱ्या भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जनता आतुरलेली असून २०२४ च्या निवडणुकीने त्यांना ही आयती संधीच चालून आली आहे,असा हल्लाबोल इंदिरा काँग्रेसची बुलंद तोफ राजाभाऊ बागुल यांनी केला.

नाशिकच्या जनतेने नेहमीच विकासाची कामे करणाऱ्या नेत्याला दिल्लीवर पाठवले आहे.हेमंत गोडसे यांनी दहा वर्षांत एकही महत्त्वाचा प्रकल्प नाशकात आणला नाही.इतरांनी आणलेल्या प्रकल्पांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न मात्र त्यांनी सातत्याने केला.त्यामुळेच तिकिटासाठी त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवले होते आणि ही त्यांच्या निष्क्रियतेची खरी पावतीच म्हणावी लागेल.यावेळी महाविकास आघाडीने सर्वसामान्य जनतेची नाडी ओळखणाऱ्या वाजेसारख्या कर्तबगार उमेदवाराला दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यांना सर्वत्र मिळत असलेला पाठिंबा म्हणजे त्यांचा विजय आजच निश्चित झाला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही,असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

नाशिकच्या सर्व भागांमध्ये महाविकास आघाडीचाच जोर असून वाजे यांना महानगरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण आपले सर्व कसब पणास लावू,असे उद्गार शिवसेना शिंदे गटाचेमहानगराध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले.

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी माजी महापौर विनायक पांडे,डी.जी.सूर्यवंशी,यतीनवाघ,सचिन मराठे,राहूल दिवे,हेमलता पाटील,प्रेमलता जुन्नरे,बबलु शेलार,संजय चव्हाण,सुरेश मारु,बाळासाहेब कोकणे,प्रथमेश गिते,रुषी वर्मा,आदि उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.