जागावाटपा आगोदरच नाशिक मध्य व पश्चिममधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर

0

नाशिक,दि १ ऑगस्ट २०२४-लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला महाराष्ट्रात अनेक जागा गमवाव्या लागल्याने अपेक्षेत यश मिळाले नाही. लोकांच्या नाराजी मुळे महायुती मोठा फटका बसला आता विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (१ ऑगस्ट) नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौरा केला होता.यात त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे नरहरी झिरवाळ यांच्या नावाची महायुतीच्या जागावाटपाआधीच घोषणा केली. यावरून महायुतीत तणाव झाल्याचे चित्र आहे. यापाठोपाठ महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज शिवसेना ठाकरे गटाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक झाली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.सुधाकर बडगुजर आणि वसंत गिते यांनी उमेदवारी करण्यासाठी एकमुखाने निर्णय झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. नाशिकच्या शिवसैनिकांचा प्रस्ताव पक्ष श्रेष्ठींना पाठवला जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेही या जागांवर दावा केल्याने वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.