शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या 

फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळी झाडल्या (थरकाप उडवणारा व्हिडीओ पहा)

0

मुंबई ,दि, ८ फेब्रुवारी २०२४ –मुंबईत आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे.ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच  मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळ्या झाडल्या अभिषेक घोसाळकर यांना ३ गोळ्या लागल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर गोळीमारणारा मॉरिस याने स्वतःवर गोळ्या चालवून स्वतःला संपवले.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे.पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःलाही गोळी घालून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहिसरमध्ये ही थरकाप उडवणारी घटना घडली.अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर गोळीबार होण्यापूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर हा गोळीबार झाल्याचे समजते. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नावाच्या स्वयंघोषित नेत्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्याने हा गोळीबार त्याच्याच कार्यालयात केला. मॉरिस दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. त्याला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिसचे काम होते.

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद होते, पण ते मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतंय. पण पुढच्याच क्षणी मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर समोरून गोळीबार केला. त्यांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या या घोसाळकरांच्या शरीरात घुसल्या. एक गोळी घोसाळकरांच्या डोक्यात घुसली. एवढं झाल्यानंतर मॉरिनने स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि संपवलं.

थरकाप उडवणारा व्हिडीओ

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.