नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का : “या” माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश 

0

नाशिक,१६ डिसेंबर २०२२ – नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून नाशिकमधील १२ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा झाला या दौऱ्याला देखील हे नगरसेवक गैरहजर होते.खा. संजय राऊत यांनी ठाकरे गटात कोणतीही फूट अथवा बंड होणार नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला. नाशिकमध्ये शिवसेनेचे ३२ नगरसेवक होते.त्यापैकी ११ नगरसेवक,तर मनसे चा १ पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाला  आहे.मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित या माजी नगरसेवकांचा प्रवेश झाला आहे.

रात्री १२ वाजेच्या सुमारास ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला,या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक नरेशजी म्हस्के,सचिव संजयजी माशीलकर, पक्ष प्रवक्त्या शीतल म्हात्रे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादासाहेब भुसे, खासदार हेमंत (अप्पा) गोडसे, आमदार सुहास  कांदे, संपर्क प्रमुख  जयंतजी साठे , संजयजी बच्छाव , सह संपर्क प्रमुख आ. काशिनाथजी मेंगाळ, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ११ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या माजी नगरसेवकांनी भेट घेतली.

Nashik corporators join Shinde group

या माजी नगरसेवकांनी केला प्रवेश 
माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते ,रमेश धोंगडे,सूर्यकांत लवटे,ज्योती खोले,जयश्री खर्जुल.सुवर्णा मटाले.चंद्रकांत खाडे,सुदाम डोमसे,प्रताप मेहेरोलिया,राजू लवटे,पूनम मोगरे,यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सचिन भोसले यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसैनिक काय असतो ते कडवट शिवसैनिकच दाखवून देतील – प्रविण (बंटी) तिदमे
काहींनी शिवसेना संपविण्याची सुपारीच घेतली आहे. मात्र, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा डाव हाणून पाडला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण सोबत घेऊन शिवसेना वाढविण्यासाठी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक एकत्र येत आहेत. बाळासाहेबांचे विचार दूर सारून नाशिक शहरात तर एका व्यक्तीच्या दावणीला पक्ष बांधण्याचे काम चालू आहे.  बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना समजून घेण्याऐवजी त्यांचे श्राद्ध घालण्याची भाषा करणाऱ्यांना बाळासाहेबांचा शिवसैनिक काय असतो ते कडवट शिवसैनिकच दाखवून देतील.
– प्रविण (बंटी) तिदमे
महानगरप्रमुख,बाळासाहेबांची शिवसेना, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.