जयभवानी रोडचे श्री तुळजा भवानी मंदिर देवस्थान नवरात्रोत्सवात २४ तास खुले राहणार

0

Navratri festival 2024
Navratri festival 2024

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

नाशिक ,दि,१ ऑक्टोबर २०२४ –नाशिक रोडच्या जयभवानी रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री तुळजा भवानी मंदिरात देवस्थानतर्फे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. विश्वस्त आणि पदाधिका-यांनी त्याची जय्यत तयारी केली आहे. नवरात्रोत्सवात मंदिर भाविकांसाठी चोवीस(२४) तास खुले राहणार आहे.

घटनास्थापना ३ ऑक्टोबरला आहे. त्या तारखेपासून दस-यापर्यंत म्हणजेच १२ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतील. चरण तीर्थ पहाटे तीन वाजता तर अभिषेक, महापूजा पहाटे तीन ते साडेपाच दरम्यान होईल. पहाटे साडेपाचला महाआरती तर दुपारी बाराला देवीला मध्यान भोग अर्पण केला जाईल. सायंकाळी आठला महाआरती होईल. प्रक्षाळ पूजा रात्री दहा ते साडेदहा दरम्यान होईल. नियमितपणे दुर्गा सप्तशती पाठ पठण दुपारी एक ते तीन वाजेला होईल.

मंदिरातील कार्यक्रम असे 
३ ऑक्टो.- पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना आणि दुपारी बाराला घटस्थापना व रात्री छबीना. ४ ते ६ ऑक्टो.-देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना. ७ ऑक्टो.- देवीची नित्योपचार पूजा, ललिता पंचमी, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना. ८ ऑक्टो.-मुरली अलंकार महापूजा व रात्री छबीना, ९ ऑक्टो.- देवीची शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबीना, १० ऑक्टो. -भवानी तलावर अलंकार महापूजा, ११ ऑक्टो.- दुर्गाष्टमी व महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा, सकाळी सात वाजता होम हवनास प्रारंभ, दुपारी सव्वा बाराला पूर्णाहुती, १२ ऑक्टो.- दुपारी बाराला होम व धार्मिक विधी, विजया दशमी उत्सव, सिमोल्लंघन, रात्री पालखीची मिरवणूक. १३ ऑक्टो.- मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमी पूजन, १६ ऑक्टो.- कोजागिरी पोर्णिमा उत्सव, १७ ऑक्टो.- देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, रात्री छबीना व जोगवा,

१८ ऑक्टो.-देवीची नित्योपचार पूजा, महाप्रसाद.
मंदिर संस्थानतर्फे भाविकांसाठी अनेक विकासात्मक कामे सुरु आहेत. त्यासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करावी, देणगी द्यावी, नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.