‘श्रेयस तळपदे’ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक 

'चल भावा सिटीत' या नव्या रिॲलिटीशो चे सूत्रसंचालन करणार !  

0

मुंबई,दि,६, मार्च २०२५-मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ पुन्हा एकदा झी मराठीवर आणि छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्या फॅन्ससाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण झी मराठीच्याच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सुपरहिट मालिकेतील यश-नेहा जोडी खूप गाजली होती. पण यावेळी श्रेयस ‘चल भावा सिटीत’ या नवा रिॲलिटी शोचा होस्ट म्हणून दिसणार आहे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने शो मध्ये रंग भरताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचं भन्नाट शीर्षकगीत नुकतंच झी मराठीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर रिलीज करण्यात आलं,

याच शीर्षकगीतातील श्रेयसची हुक स्टेप आणि श्रेयसचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धक एकत्र येणार असून, स्पर्धकांना अश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त करेल. ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील, आणि त्यांना आव्हान देतील.

चल भावा सिटीत हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल.सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच. अशी एक अफलातून संकल्पना जिचा प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल आता तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या लाडक्या झी मराठीवर. चल भावा सिटीत शो जो बदलणार मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा. ‘श्रेयस तळपदे’ यांचं हे कमबॅक प्रेक्षकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. त्याच आकर्षक व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना नक्कीच एक खास अनुभव देईल.

 

तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा नवा कार्यक्रम ‘चल भाव सिटीत’ १५ मार्चपासून दररोज रात्री ९.३० वा. झी मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!