..तर त्र्यंबकेश्वरमध्ये उत्तराखंडसारखी परिस्थिती उद्भवू शकते : श्री एम
अविरल गोदावरी अभियानाबाबत पत्रकार परिषदेत माहिती
नाशिक, दि. ३ ऑक्टोबर २०२३ – प्रकृतीच्या शुद्धीकरणाकडे लक्ष दिले, सेवा केली तर भविष्यात जगणे सुसह्य होईल. भविष्याचा विचार केला पाहिजे. नाशिकचे वातावरण पोषक असे दिसले आहे. अनेक जणांचा सहभाग पाहून निश्चितच मला आशा आहे. लवकर नद्यांचे पुनरुज्जीवन होईल. वातावरण, जंगल, नद्या यांची देखभाल, स्वच्छता नाही केली तर येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसून येतील. बनारसमध्ये काम सुरू आहे. आपल्याकडे अजूनही मातीचे दोन थर आता आहेत. यावर काम नाही केले तर त्र्यंबकेश्वरमध्ये उत्तराखंडसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असे मत सत्संग फाउंडेशन, आंतरराष्ट्रीय समन्वयक आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केले.
तमो गुणातून मनाला सत्त्वगुणाकडे जायचे असेल तर रजोगुण स्वीकारला पाहिजे. प्रकृतीच्या शुद्धीकरणाकडे लक्ष दिले, सेवा केली तर भविष्यात जगणे सुसह्य होईल. भविष्याचा विचार केला पाहिजे. नाशिकचे वातावरण पोषक असे दिसले आहे. अनेक जणांचा सहभाग पाहून निश्चितच मला आशा आहे. लवकरचे नद्यांचे पुनरुज्जीवन होईल.असं ही ते म्हणाले
गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी उत्तमरीत्या काम होत आहे. नाशिकमध्ये सन २०२७- २८ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत प्लास्टिकमुक्त गोदावरीचा आपण सर्व जण संकल्प करूया. पुढील काळात वृक्षलागवड, नदीस्वच्छता अन् कुंडाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लोकसहभाग आणखी वाढेल अन् गोदावरी प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वास आध्यात्मिक गुरू एम यांनी व्यक्त केला. दृष्टीने अविरल गोदावरी अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत काल सकाळी गोदापूजन करून करण्यात आला.
अविरल गोदावरी अभियानाबाबत माहिती देताना राहणार आहे. ते बोलत होते. यावेळी नमामि गोदा फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि अभिनेते चिन्मय उदगीरकर, राजेश पंडित,अभिनेता किरण भालेराव आदी उपस्थित होते. सत्संग फाउंडेशन आणि नमामि गोदा सहयोगाने लोकसहभागातून हे काम करायचे आहे, असे नमामि गोदा फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी माहिती दिली. अविरल गोदावरी मिशन, सत्संग फाउंडेशन, नमामि गोदा फाउंडेशन आणि भागीदार संस्थांनी ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथील गोदावरी नदी पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
लोकसहभागातून ही चळवळ त्र्यंबकेश्वर येथे पहिला टप्पा अविरल गोदावरी मिशन हा एक बहुभागधारक उपक्रम आहे. ज्यामध्ये अनेक नागरी संस्था, सामाजिक आणि पर्यावरणाबाबत जागरूक व्यक्ती, खासगी कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि सरकारी विभाग एकत्र येतात. जुलै २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या पुढील कुंभमेळ्यापूर्वी पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पातून मिळणारे धडे संपूर्ण भारतभर तसेच जागतिक स्तरावर पाहायला मिळतील. – चिन्मय उदगीरकर