४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळात – शुभांशु शुक्ला यांनी रचला इतिहास
राकेश शर्मा नंतर दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला
नवी दिल्ली/फ्लोरिडा, २५ जून २०२५ –Shubhanshu Shukla Axiom4 Mission भारताचे वायूदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज १२:०१ वाजता IST अंतराळात यशस्वी झेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर (Launch Pad 39A) वरून Axiom-4 Mission अंतर्गत Falcon-9 रॉकेट द्वारे स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्ट मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) कडे प्रस्थान केले.
राकेश शर्मा नंतर दुसरे भारतीय अंतराळवीर(Shubhanshu Shukla Axiom4 Mission)
१९८४ मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर ४१ वर्षांनी एखाद्या भारतीयाने अंतराळात झेप घेतली आहे. लखनऊ येथील रहिवासी शुभांशु शुक्ला हे या ऐतिहासिक मिशनमध्ये चार सदस्यीय जागतिक क्रूमध्ये सहभागी झाले आहेत. या मिशनसाठी त्यांनी एका वर्षाची कठोर प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण केली होती.
Nothing like a liftoff 🚀@Axiom_Space‘s #Ax4 mission, riding atop a @SpaceX Falcon 9 rocket, launched from @NASAKennedy at 2:31am ET (0631 UTC). pic.twitter.com/RuvVZ9shT6
— NASA (@NASA) June 25, 2025
🔬 गगनयानसाठी वैज्ञानिक पाया
भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान ह्युमन स्पेस फ्लाइट मिशनसाठी ही उड्डाण एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जात आहे. या मिशनमधून प्राप्त होणारे मायक्रोग्रॅव्हिटी, पोषण, जैविक व भौतिक प्रयोगांचे परिणाम भारतीय संशोधनासाठी अमूल्य ठरणार आहेत.
🗨️ राजकीय व वैज्ञानिक प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्ला यांचे अभिनंदन करत म्हटले, “१४० कोटी भारतीयांचे स्वप्न आज अंतराळात झेपावले आहे.”
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत.”
ISPA चे तज्ज्ञ आर.सी. कपूर व EN-SPACE चे अध्यक्ष गोयनका यांनी शुक्ला यांच्या उड्डाणाला गगनयान मोहिमेच्या यशासाठी आवश्यक टप्पा मानले आहे.
🛰️ जागतिक अंतराळ सहकार्याचे प्रतीक
या मिशनमध्ये वेगवेगळ्या देशांतील चार अंतराळवीर एकत्र काम करत आहेत, हे सांस्कृतिक एकतेचे व वैज्ञानिक सहकार्याचे प्रतीक ठरले आहे. हे चारही अंतराळवीर एकत्रितपणे ISS मध्ये महत्त्वाचे प्रयोग करतील.