सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री,तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री :२० मे रोजी होणार शपथविधी 

0

कर्नाटक,दि. १८ मे २०२३ – कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमधील संघर्ष आता संपला आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी अधिकृत घोषणा काँग्रेसने केली आहे. यासोबतच डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री केले जाणार आहे. डीके शिवकुमार हे राज्याचे एकमेव उपमुख्यमंत्री असतील.त्याचबरोबर शिवकुमार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदही कायम राहतील. खरे तर गेल्या चार-पाच दिवसांपासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार मंथन सुरू होते.एका बाजूला डीके शिवकुमार आणि दुसऱ्या बाजूला सिद्धरामय्या होते. दोघेही आपापले दावे ठामपणे मांडत होते. पण हायकमांडने अखेर सिद्धरामय्या यांच्या नावाला सहमती दर्शवली

यासोबतच डीके शिवकुमार यांनाही अनेक महत्त्वाची पदे दिली जाणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,२० मे रोजी शपथविधी होणार आहे.या दोघांचेही काँग्रेसने कर्नाटकचे आधारस्तंभ म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्ष हा लोकशाही पक्ष आहे आणि लोकशाही प्रक्रियेनुसार निर्णय घेतले जातात. केसी वेणुगोपाल म्हणाले की सिद्धरामय्या हे सक्षम प्रशासक आहेत, तर डीके शिवकुमार यांनी चांगली क्षमता दाखवली आणि त्याचा परिणाम आम्हाला निवडणुकीत मिळाला.हे दोघेही कर्नाटकचे करिष्माई नेते आहेत आणि आमचा दोघांवर विश्वास आहे. आमचा सर्वसंमती वर विश्वास असून मुख्यमंत्रिपदावर एकमत होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो,असे ते म्हणाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!