Sikkim Cloud Burst:सिक्किममध्ये ढगफुटीमुळे पूर : लष्कराचे २३ जवान बेपत्ता

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला इशारा

0

सिक्कीम,दि.४ ऑक्टोबर २०२३ –सिक्कीममध्ये आलेल्या पुरामुळे लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने (Sikkim Cloud Burst) लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला पूर आला. त्यामुळे खोऱ्यातील काही लष्करी आस्थापनांना फटका बसला आहे. चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यामुळे, पाण्याची पातळी अचानक १५-२० फूट इतकी वाढली आहे आणि सिक्कीमच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंगतामजवळील बरडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांना पुराचा तडाखा बसला असून २३ लष्करी जवान बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्या शोध मोहीम सुरू आहे. याशिवाय  ४१ वाहने वाहून गेली आहेत तर काही वाहने चिखलात बुडाल्याचेही वृत्त आहे.सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग घटनास्थळी भेट देतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

परिस्थितीची माहिती देताना संरक्षण पीआरओ म्हणाले की,चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीम पाण्याची पातळी अचानक १५-२० फूट उंचीवर गेली.त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली. खोऱ्यातील काही लष्करी आस्थापनांवर परिणाम झाला असून तपशीलांची पुष्टी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २३ जवान  बेपत्ता असून काही वाहने चिखलात बुडाल्याची माहिती आहे

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला इशारा
सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसएसडीएमए) चेतावणी जारी केली आहे आणि म्हटले आहे की मंगन जिल्ह्याच्या उत्तर भागात ढग फुटल्यामुळे तिस्ता नदीला पूर आला आहे. सर्वांना सतर्क राहण्याचा आणि नदीपात्रातून प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डीएसी, नामची यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे आदर्शगाव, समर्दुंग, मेल्ली आणि इतर संवेदनशील ठिकाणांवरील सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.सर्वसामान्य जनतेने अफवा पसरवू नये आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात अचानक आलेल्या आपत्तीमुळे सोरेंग येथील नरबहादूर भंडारी जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.