देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन बडोद्याला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाट्न
नाशिक,९ नोव्हेंबर २०२२ –अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण मध्यवर्ती मंडळ मुंबई या संस्थेचे या संस्थेचे रौप्य महोत्सवी अधिवेशन येत्या १२ व १३ नोव्हेंबरला गुजरात मधील बडोदा या शहरात होत आहे . या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे . अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष व नाशिक देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी दिली .
या अधिवेशनाला शनिवारी सकाळी ९ वाजता सुरुवात होईल . त्या नंतर दुपारी १२ वाजता महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते उदघाटन होईल . या दोन दिवसात होणाऱ्या अधिवेशनात युवकांचे प्रश्न , महिला उद्योग व्यवसाय विषयक मेळावा ,समाज संघटन ,अश्या विविध विषयावर चर्चा सत्रे , परिसंवाद,व्याख्याने होणार आहेत .
रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी या अधिवेशनाचा समारोप होणार आहे .हे रौप्य महोत्सवी अधिवेशन असून या अधिवेशनास देशभरातून मध्यवर्ती मंडळाशी संलग्न असलेल्या संस्थांचे सुमारे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहतील ,अशी माहिती मुकुंद कुलकर्णी यांनी दिली .तरी या अधिवेशनासाठी अधिकाधीक संख्येने ज्ञाती बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले . ज्या ज्ञाती बांधवाना अधिवेशनासाठी उपास्थी राहावयाचे आहे त्यांनी देशस्थ ऋग्वेदी संस्था नाशिक येथे संपर्क साधावा.
नाशिक येथून ५० प्रतिनिधी जाणार
बडोदा येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी त्रंबकेश्वर,येवला,निफाड,नाशिकरोड,नाशिक येथून सुमारे पन्नास प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक प्रशांत निरंतर व संदीप गोसावी यांनी दिली .