महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह सहाजणांची निर्दोष मुक्तता

0

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहाजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला.सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. दिल्ली उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देताना म्हटलं आहे.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ताय अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. दिल्ली उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देताना म्हटलं आहे.

कोर्टाचा निकाल काय आहे ?

या अर्जावर विशेष न्यायाधीश एच.एस. सातभाई यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांविरोधात करण्यात आलेले आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे तपासयंत्रणेकडे उपलब्ध नाहीत. कायद्यानुसार २० टक्के रक्कम विकासक खरेदीदारांकडून कोणताही करार न करता घेऊ शकतात. या प्रकरणात विकासकांनी केवळ १० टक्के रक्कम खरेदीदारांकडून घेतली होती आणि पैशांचा वापर प्रकल्पाच्या विकासासाठीच केला आहे. त्यामुळे खरेदीदारांकडून ही रक्कम बेकायदेशीररीत्या घेतलेली नाही, तसेच विकासक कंपनीने जमीन अधिग्रहण करण्यासाठी १३५ कोटी रुपये खर्च केल्याचा दावाही भुजबळांच्यावतीने वकील सुदर्शन खवसे आणि सेजल यादव यांनी कोर्टात केला. त्याची दखल घेत न्यायालयाने पंकज आणि समीर भुजबळ यांच्यासह दोन्ही विकासकांची फसवणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

 

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष 

महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ आणि इतरांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर नाशिक येथील कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.