पंडिता स्नीती मिश्रा यांच्या गायनाने पिंपळपारावर रंगणार संस्कृतीची पाडवा पहाट
डॉ.कैलास कमोद यांचा संस्कृती पुरस्काराने होणार सन्मान
नाशिक,दि,१० नोहेंबर २०२३ –ऐतिहासिक पिंपळपारावर साकारणारी दीपावली पाडवा पहाटेची स्वरमैफल’नाशिक रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय । संस्कृती नाशिकचा हा सुरेल उपक्रम सन १९९८ च्या दीपावली पाडव्यापासून सुरु झाला आहे. संस्थेने नाशिकच्या सांगितीक सांस्कृतीक परंपरेचा वारसा नवोदितापर्यंत पोहोचावा तसेच भारतातील नामवंत शास्त्रीय गायक कलावंतांच्या गायकीचा नाशिककरांना आस्वाद घेता यावा हा या कार्यक्रमाचा उद्देश.! यंदाचे वर्ष है या मैफिलीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
आजपावेतो स्वरभास्कर भारतरल पंडित भिमसेन जोशी, गानतपस्विनी किशोरीताई अमोणकर, शोभा मुद्दल, पं. राजन साजन मिश्रा, पंडित अश्विनी भिडे-देशपांडे, स्वराधीश पं. भरत बलवट्टी ,सुरेश वाडकर,यासारख्या अनेक दिग्गज गायकाच्या स्वराभिषेकाने पिंपळपार चिंब झाला आहे. देशविदेशात पाडवा पहाटचा स्वविष्कार नाशिकची सांस्कृतीक ओळख ठरला आहे..!
गायनाच्या कार्यक्रमात व्यतिरिक्त संस्थेने शिव व्याख्याते सचिन कानिटकरांची व्याख्यानमाला हुतात्मा शौर्य जन्म शताब्दी सोहळा, ग्रंथयात्रा असे असंख्य सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत देखण्या स्वरूपात सादर केले आहेत.
यंदाच्या वर्षी ग्वालियर घराण्याची युवा गायिका पंडिता स्नीती मिश्रा आपल्या गायकीने हो मैफल सजविणार आहे.स्नीती मिश्रा या झी सारेगमपच्या २०१० च्या सुपरस्टार असून शास्त्रीय संगिताचे शिक्षण त्यांनी गुरु श्री. रघुनाथ साहू यांच्याकडे पूर्ण केले असून देशविदेशात त्यांचे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम गाजले आहेत शास्त्रीय गायना बरोबरच उपशास्त्रीय गायन,मराठी नाट्यगीते अभंग,सुफी भजन यावरील त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी सवाई गंधर्व भिमसेन महोत्सवात तसेच बालगंधर्व संगीत महोत्सवात सन २०२२ साली आपली कला सादर केली आहे.
इंडो स्वीडीश इंटरनॅशनल बँड मध्ये ज्येष्ठ तालवादक पंडित शिवमणी आणि ग्रॅमी अवार्ड नामांकित झाज म्युझिशियन ल्युईस बैंक यासारख्या कलाकारासोबत आपली गायनकला सादर केली आहे. त्यांना बाजी राऊत सन्मान प्राप्त झाला आहे.स्नीती मिश्रा यांनी हिंदी व्यतिरिक्त तामिळ,मराठी,काश्मिरी,उडीसा अशा अन्य भाषांमध्ये गायन केले आहे त्यांना जानेवारी २०२३ मध्ये उडिसा शासनाने घेतलेल्या मेन्स हॉकी वर्ल्ड कपमध्ये गायनाची संधी मिळाली आहे.
यंदा पाडवा पहाटच्या कार्यक्रमात त्यांना तबला साथ संगत पंडित अजित पाठक हे करणार असून सारंगीची साथ ज्येष्ठ सारंगी वादक उस्ताद महमूद खान (सारंगी सम्राट) यांचे नातू उस्ताद मोमीनखान करत असून हार्मोनियमची साथ ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसककर हे करत आहे.या मैफलीच्या निमिताने आपल्या परंपरेनुसार या वर्षी मा.डॉ.कैलास कमोद,ज्येष्ठ मधुमेह तज्ञ यांना त्यांनी केलेल्या सामाजिक बनाकरीता संस्कृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.