खास ऑफर : विमानाच्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

0

मुंबई – कोरोनाच्या महामारी संपवण्यासाठी भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारतात जवळपास ६४ कोटी लोकांचे लसीकरण झाले असून त्यापैकी १२ कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत. त्यामुळे आपल्या शेजारील देश श्रीलंकेने लसीचे दोन डोस झालेल्या पर्यटकांसाठी श्रीलंकन एअरलाइन्स भारतीय प्रवाशांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. श्रीलंकन एअरलाइन्स भारतीय पर्यटकांसाठी ‘एक खरेदी करा आणि एक विनामूल्य मिळवा’ ऑफर घेऊन आली आहे, ज्या अंतर्गत कोलंबोहून भारतात परत जाण्यासाठी एका तिकिटासह एक तिकिट मोफत असणार आहे.श्रीलंकन एअरलाइन्सच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त हि विशेष ऑफर देण्यात आली आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांना यापुढे श्रीलंकेत क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. परंतु यासाठीही काही अटी घालण्यात आल्या आहेत. एअरलाइन्सने म्हटले आहे की, भारतातून श्रीलंकेत येणाऱ्या पर्यटकांनी लसीचा दुसरा डोस किमान १४ दिवसांपूर्वी घेतला पाहिजे. यानंतर, श्रीलंकेला जातांना, आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असणार आहे , जी निगेटिव्ह आली पाहिजे. जर एखाद्या पर्यटकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याला रुग्णालयात नेले जाईल. तसेच निगेटिव्ह आढळलेली व्यक्ती आपल्या इच्छेनुसार देशात कुठेही फिरता येणार आहे.

त्याचबरोबर देशात फिरतांना त्याला कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार आहे म्हणजेच तेथे सामाजिक अंतर राखणे मास्क वापरणे आणि स्वच्छतेची विशेष काळजी हे नियम बंधनकारक आहेत. श्रीलंका एअरलाइन्सचे वर्ल्डवाइड सेल्स आणि डिस्ट्रिब्यूशनचे प्रमुख दिमुतु तेन्नाकून म्हणाले की, श्रीलंका कोवॅक्सीनसह भारतात प्रशासित सर्व लसींना मान्यता देत आहे.

श्रीलंकन एअरलाइन्स १ सप्टेंबरपासून भारतादरम्यान आपली सेवा पुन्हा सुरू करत आहे. कोलंबो ते मदुराई, तिरुचिरापल्ली, त्रिवेंद्रम आणि कोची पर्यंत साप्ताहिक उड्डाणे असतील. कोलंबो ते दिल्ली आणि हैदराबादसाठी आठवड्यातून दोनदा उड्डाणे चालतील. चेन्नई आणि मुंबई दरम्यानच्या सेवा आठवड्यातून ५ दिवस आणि बेंगळुरू दरम्यानच्या सेवा आठवड्यातून तीन दिवस वाढवल्या जातील.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.