दशक १३ समास आठ कर्ता निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ.श्रोता वक्त्याला विचारतो,कर्ता कोण आहे? सगळी सृष्टी, ब्रह्मांडाचे निर्माण कोणी केले? तेव्हा सभा नायक असलेले वक्ते काय म्हणाले ते ऐका, एक म्हणतात देव कर्ता, एक म्हणतात कोण देव? आपआपला अभिप्राय लोक सांगतात. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थ स्पष्ट करतात. आपापली उपासना श्रेष्ठ असल्याचं जगामध्ये मानतात. कोणी म्हणतात कर्ता देव मंगलमूर्ती आहे. कोणी म्हणतात सरस्वती सर्व करते. कोणी म्हणतात कर्ता भैरव आहे. एक म्हणतात खंडेराव, एक म्हणतात वीर देव. एक म्हणतात भगवती, एक म्हणतात नरहरी. एक म्हणतात बनशंकरी, एक म्हणतात नारायण सर्व करतो.
एक म्हणतात श्रीराम कर्ता, एक म्हणतात श्रीकृष्ण कर्ता. एक म्हणतात भगवंत कर्ता, केशवराज. एक म्हणतात पांडुरंग, एक म्हणतो श्रीरंग. एक म्हणतात झोटिंग सर्व करतो. एक म्हणतो मुंज्या कर्ता. एक म्हणतात सूर्य कर्ता. एक म्हणतात अग्नी कर्ता. सगळं काही अग्नि करतो. एक म्हणतो, लक्ष्मी करते. एक म्हणतो मारुती करतो. एक म्हणतो धरित्री करते. एक म्हणतात तुकाई, एक म्हणतात यमाई, एक म्हणतात सटवाई सर्व करते. एक म्हणतात भार्गव कर्ता. एक म्हणतात वामन कर्ता. एक म्हणतात परमात्मा कर्ता एकच आहे. एक म्हणतात विरण्णा कर्ता. एक म्हणतात बसवन्नाकर्ता. एक म्हणतात रेवण्णा सर्व काहीकरतो. कोणी म्हणती रवळनाथ कर्ता. एक म्हणतात कार्तिकस्वामी कर्ता. एक म्हणतात व्यंकटेश कर्ता. एक म्हणतात गुरु कर्ता. एक म्हणतात दत्त कर्ता. एक म्हणतात मुख्य कर्ता वोढ्या जगन्नाथ. एक म्हणतात ब्रह्मा कर्ता, एक म्हणतात विष्णू कर्ता. एक म्हणतात महेश कर्ता. एक म्हणतात पर्जन्य कर्ता. एक म्हणतात वायू कर्ता. एक म्हणतात निर्गुण देव करून अकर्ता आहे.
एक म्हणतात माया करते. एक म्हणतात जीव करतो, एक म्हणते सर्व प्रारब्ध योगामुळे होते. एक म्हणतात प्रयत्न करतो. एक म्हणतत स्वभाव करतो. एक म्हणतो कोण करतो कोण जाणे? असा कर्त्यांचा विचार. विचारले तर हा नुसता बाजार भरलेला आहे. आता कोणाचं उत्तर खरं म्हणायचं? ज्यांनी जो देव मानला त्याला ते कर्ता म्हणतात. असा लोकांचा गोंधळ आहे, तो कमी होत नाही. आपापल्या अभिमानामुळे सगळ्यांनी आपल्या देवाचे नाव घेतले. खरा विचार पहिलाच जात नाही. अनेक लोकांचा असा विचार काहीही असू द्या, हा बाजार इथेच राहू द्या. परंतु याचा विचार असा आहे श्रोत्यांनी सावधान व्हावं. तर्क सोडून द्यावा आणि जाणत्या पुरुषांनी प्रत्यक्ष प्रमाण मानावे. जे जे कर्त्याने केले, तेथे त्यानंतर झालं. कर्त्याच्या पूर्वी आढळले नसावे. जे केले ते पंचभौतिक, ब्रह्मादिक. पंचभूतिक भूतांश निर्माण केले हे तर घडले नाही. पंचभूतांना वेगळं करावं, मग कर्त्याला ओळखावे. पंचभौतिक स्वभाव कर्त्यात आले आहेत.
पंचभूतांपेक्षा वेगळं निर्गुण आहे तिथे काहीही कर्तेपण नाही, निर्विकाराला विकार कोणीही लावू शकत नाही. निर्गुणाला कर्तव्य घडत नाही. सगुण झालेल्या कार्यात सापडते. आता कर्तव्यता कोणाकडे आहे पहा बरं? खोट्याचा कर्ता कोण हे विचारणच चुकीचे आहे. म्हणून सहजपणे झाले हेच प्रमाण होय. एक सगुण एक निर्गुण. कर्तेपण कोणाला लावायचे? या अर्थाचे विवरण पहा. सगुणाने सगुण केलं तरी ते पूर्वीच झालेले आहे. निर्गुणांना कर्तव्य लावलं तरी तसं होऊ शकत नाही. म्हणजे कर्ता काही दिसत नाही. तर्क करावा लागतो अनुभव घेतला तर समजेल. दृश्य सत्यपणे नाहीच. केले ते सगळे खोटं तरी कर्ता हे म्हणणंच अयोग्य. वक्त म्हणाला अरे विवेकाने पहा! आता अनुभव आला तरी गोंधळ कशाला करतो? आपल्या अंतरी आम्ही प्रचिती येईल तसं पहा. विवेकी माणूस जो आहे तोच हे जाणू शकतो. त्याच्यासाठी पूर्वपक्ष जो आहे तो उडवावा. लागतो अन्यथा अनिर्वाच्य सुख मिळणार नाही. तेव्हा श्रोत्याने प्रश्न केला देहाचा सुखदुःखभोक्ता कोण? पुढे याचेच निरूपण करीत आहे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कर्ता निरुपण नाम समास अष्टम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७