भावार्थ दासबोध – भाग १९०

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

आजचा रंग – मोरपंखी 

Vidya Karanjikar
विद्या करंजीकर(अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये) 
 
दशक १४ समास ५ हरिकथा लक्षण निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. हरी कथेमध्ये भक्तीचा रंग तयार करून परमात्म्याचे ध्यान करावे. ध्यानामध्ये मन गुंतलं तर लोक कसे आठवतील? निशंक निर्लज्ज कीर्तन केल्यावर रंग तयार होईल. रागज्ञान, तालज्ञान, स्वरज्ञानाने व्युत्पन्न अर्थ असलेलं कीर्तन करावे. ५६  भाषा, नाना कला, कंठात कोकिळेप्रमाणे माधुर्य असले तरी भक्तिमार्ग वेगळा आहे हे भक्त जाणतात. भक्तांना देवाचं ध्यान आवडतं. देवांशिवाय त्यांना जेवण सुद्धा सुचत नाही. कलावंतच मन असतं ते मात्र नादलुब्ध असते. श्रीहरीविरहीत जी कला आहे ती अवकळा जाणावी. देवाला सोडून माणूस वेगळा झाला, असं होतं. चंदनाला सर्पाने वेढा घातला, धनावर पिशाच्च बसलेल आहे, त्याप्रमाणे देवाच्या आड नाना कला आल्या आहेत.

देवाला सोडून नादामध्ये मग्न होणे म्हणजे प्रत्यक्ष विघ्न आडवं आल्यासारखे आहे. स्वरामध्येच मन गुंतलं तर श्रीहरीच चिंतन कोण करील? बळजबरीने चोरी करून सुश्रुषा सेवा घ्यायची तसं झालं ते. देवाचे दर्शन करण्याच्या आड रागाचे ज्ञान येते म्हणून मन स्वराच्या मागे नेले. राजाच्या द्वाराही भेटायला गेला त्याला पकडतात तसं कलावंताची जी कला आहे ती कलेने केले. ईश्वराकडे मन ठेवून जो हरीकथा करतो तोच संसारामध्ये धन्य जाणावा. ज्याला हरिकतेची गोडी आहे, त्याविषयी त्याला नित्य नवी आवड निर्माण होते त्याला सर्वोत्तमाची प्राप्ती होते. हरीकथा जिथे मांडलेली आहे तिथे सर्व सोडून धावतो, आळस, निद्रा, स्वार्थ हे सगळं सोडून जो हरिकथेपुढे सादर होतो,

हरिभक्ताच्या घरी जातो, त्याची सेवा करण्यासाठी किरकोळ कामे देखील करतो, तो सर्वांना जाणीवपूर्वक सहाय्य करतो त्याचं नाव हरिदास आहे. त्याच्या नावामध्ये विश्वास आहे. असं सांगून हा समास इथे पूर्ण झाला असे समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम पंचम समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक १४ समास ६ चातुर्य लक्षण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. रूप लावण्य हे अभ्यास करून मिळवता येत नाही. जन्मतः असलेल्या काही गुणांपुढे काही उपाय चालत नाही. त्यामुळे काही नवीन गुण माणसाने जोडायला हवे. काळे माणूस गोरे होत नाही. देवीचे वण असतील तर त्याच्या पुढे काही चालत नाही. मुक्याला वाचा फुटत नाही, हा सहज गुण आहे.  आंधळा माणूस डोळस होत नाही, बधिर माणूस ऐकू शकत नाही, पांगळा माणूस पाय कुठून आणेल? अशी कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगायची? त्यामुळे रूप लावण्या हे पालटत नाही. मात्र अवगुण असतात ते सोडल्यावर जातात. उत्तम गुण अभ्यास केल्यावर प्राप्त होतात. कुविद्या सोडून शहाणे लोक विद्या शिकतात.

मूर्खपण सोडल्यावर जाते. शहाणपण शिकता येते. कारभार केल्यावर सगळं काही समजतं. लोकांनी मान्यता द्यावी असं वाटतं मग गुणांची उपेक्षा का करायची? चातुर्याशिवाय उच्च पदवी कधीही मिळणार नाही. अशी मनामध्ये प्रचिती येते मग स्वहित का करायचं नाही? सन्मार्गाने चालावं, मग जन सज्जन लोक मानतात. देह व्यवस्थितपणे शृंगारला पण चातुर्य नसेल तर त्याचा उपयोग नाही. गुण नसताना बाष्कळपणा असेल तर त्याला अर्थ नाही. आंतरकळा म्हणजे आतले गुण असतात त्यांचा शृंगार करावा.

नाना परीने ही जी संपदा आहे ती मिळवावी. प्रयत्न करत नाही, शिकत नाही, शरीराला कष्टही देत नाही, उत्तम गुण घेत नाही सदा कोपिष्ट असतो, आपण दुसऱ्याचं करावं, उसने घेतलेले परत करावे तसं काम करावं.  लोकांच्या साठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतील. न्यायाने वर्तन करेल तो शहाणा.  अन्याय करील तो दीनवाणा. चातुर्याच्या नाना खुणा चतुर माणूसच जाणतो. ज्याला अनेकांनी मानले, ते अनेकांनी मान्य केले; बाकीचे व्यर्थ गेले. त्याची जग निंदा करतो! असं समर्थ सांगत आहे आणि ही कथा चातुर्यरक्षणाची कथा पुढच्या भागात आपण ऐकू या.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.