भावार्थ दासबोध -भाग -९४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ७ समास ४ विमल ब्रह्म निरूपण
जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीमध्ये ब्रह्म व्यापले आहे.मात्र पृथ्वी नष्ट झाली तरी ब्रम्ह नष्ट होत नाही. ते पाण्यामध्ये असूनही पाणी नष्ट होते तसे ब्रह्म नष्ट होत नाही. तेजामध्ये ब्रह्म असते परंतु ते जळून जात नाही.वाऱ्यामध्ये असले तरी ते हलत नाही,आकाशामध्ये आपले तरी कळत नाही. संपूर्ण शरीरामध्ये ते व्यापून उरले आहे, तरी कोठे आढळत नाही. जवळ असूनही दुरावलेले असते, हे एक नवलच आहे.चहूबाजूला ते पसरलेले आहे तरी दिसत नाही. आत-बाहेर सर्वत्र ते आहेच. त्यामध्येच आपण, आपल्या आत-बाहेर असते अशी ही गगनासारखी दृष्या पेक्षा वेगळी खूण आहे.काही नाही असे वाटले तरी तेथेही ते भरलेले आहे.

आपल्याला आपले धन आपल्याला दिसतच नाही तसे. जो जो पदार्थ दृष्टीला पडतो त्या त्या पदार्थाच्या बाहेर पदार्थाचे अस्तित्व असते, मग त्याचे नाव घेतले जाते आणि त्यातून ते समजतं. मागेपुढे आकाश, त्याप्रमाणे पदार्थांशिवाय सगळीकडे पोकळी आहे, पृथ्वीशिवाय सगळे अवकाश पसरलेले आहे. जे जे रूप आणि नाव घ्यावे तेथे तेथे ब्रह्म आहे. त्याचे नाम रूपाच्या पलिकडचे गुपित अनुभवीच जाणू शकतो. आकाशामध्ये धुराचे डोंगर वरवर येतात तसे मायादेवी अवडंबर दाखवित असते. अशी माया अशाश्वत आहे, ब्रह्म हे शाश्वत आहे, ते सर्वांच्या ठायी सदोदित भरलेले आहे. पोथी वाचायला लागले तर अक्षरांमध्ये ते आहे, डोळ्यातूनही ते आहे, ऐकल्यावर शब्दांमध्ये देखील ते आहे, मनामध्ये विचार येतात आणि मनाच्या आतबाहेर परब्रम्ह असते.

रस्त्यावर आपले पाऊले पडतात, त्यामध्ये किंवा सर्व अंगामध्ये, हातामध्ये एखादी गोष्ट हाताने घेतो आपण तेव्हा त्यातही ब्रह्म असते. अशा प्रकारच्या सगळ्या इंद्रिय समुदायांमध्ये त्यांचे वर्तन चालू असतं. त्यांची हालचाल चालू असते. जवळच ते ब्रह्म असते ते पाहायला गेले तर दिसत नाही. आणि दिसले नाही तरी असते, ते अनुभवाने जाणावे. आपल्या स्वानुभवामुळे ब्रम्ह प्राप्त करता येते. ते ज्ञानदृष्टीने दिसते, चर्मदृष्टीने ते पाहिले तर दिसत नाही, ही अंतर्दृष्टी असलेल्याची साक्ष अनुभवी जाणतात.आहे.

ब्रह्म आणि जाणण्याची किमया अनुभवामुळे शक्य होते. अनुभवाची जाणीव सर्वसाक्षी असलेल्या तूर्यावस्थेमुळे येते. त्या साक्षी वृत्तीचे कारण उन्मनी अवस्था आहे, उन्मनी म्हणजे निवृत्ती. तिथे विज्ञान आणि जाणीव संपते. अज्ञान संपते, ज्ञानही उरत नाही. अनुभव घेताना ज्ञानाचे भान उरत नाही. एकत्वाचा अनुभव निराळा राहात नाही. ब्रह्मसाक्षात्कारात असे परम पूर्ण ऐक्य होते. असे ब्रम्हे शाश्वत असून अजून तिथे सर्व कल्पना संपतात. योगी जनांना एकांतात अनुभवाने हे जाणता येते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!