नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार.!

नवीन वर्षात सरकारकडून गिफ्ट भरत गोगावले यांची घोषणा

0

किरण घायदार 
नाशिक ,१८ डिसेंबर २०२४ –राज्यातील नवीन फडणवीस सरकारने सत्तेवर येताच महाराष्ट्रासाठी 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या मंचावरून महाराष्ट्रातील सागरी बंदरे, परिवहन, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे.याच पार्श्वभूमीवर राज्यातील गावांना तालुका आणि शहरांशी जोडणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात नववर्षानिमित्त १३०० पेक्षा जास्त आधुनिक बस सामील करण्यात येणार आहे.

राज्यातील एसटी महामंडळाच्या बसला ‘लालपरी’ या नावाने ओळखले जाते, जी गावागावांत लोकांना जोडण्याचे काम करते. मात्र, मागील काही वर्षांत बस कमी झाल्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 11 लाखांपर्यंत घट झाली आहे. कोविडपूर्व काळात एसटीच्या ताफ्यात जवळपास १८,५०० बस होत्या. त्यापैकी 15,500 बस सेवा देत होत्या आणि दररोज 65 लाख प्रवासी एसटी बसचा वापर करत होते.

कोविड नंतर ताफ्यातील १,००० बस बंद पडल्या. त्यामुळे प्रवाशांची संख्या ६५ लाखांवरून ५४ लाखांपर्यंत घटली आहे. बसेसची कमतरता असल्याने आणि प्रवाशांची मागणी जास्त आहे.नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या” लालपरी ” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली.

सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये आता १४ हजार बसेस असून करोना महामारीपूर्वी म्हणजे सन २०१८ मध्ये एसटी कडे तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या ३-४ वर्षात करोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त बस फेऱ्या देणे शक्य होईना. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा व १३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सुमारे साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला सुरू होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसेसची दोन, दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारीला कमी होतील. असे प्रतिपादन  गोगावले यांनी यावेळी केली.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यातील सर्व बस स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून, काही बस स्थानके ही शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानके बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्त्वावर खाजगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत. मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकाऱ्यांने राज्यभरातील १८३ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता गती प्राप्त झाली असून, नागपूर मधील गणेशं पैठ बसस्थानकाचे काँक्रिटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणं बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचा नावलौकिक होईल,असा गौरव गोगावले यांनी यावेळी केला.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील गावांना तालुका आणि शहरांशी जोडणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात नववर्षानिमित्त 1300 पेक्षा जास्त आधुनिक बस सामील करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सध्या एसटी महामंडळाचा एकूण तोटा ११,०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

एसटी महामंडळाने  मुंबई-पुणे, नाशिक-संभाजीनगर, नागपूर-अमरावती यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रत्येकी सुमारे 450 बस सुरू करण्यात येणार आहेत. या नव्या बस नववर्षापासून सेवेत येतील, अशी शक्यता आहे. महामंडळाला अपेक्षा आहे की, राज्यातील लालपरी गेल्या काही वर्षांत झालेला तोटा भरून काढून नफा कमावेल. याशिवाय राज्यातील प्रवाशांना या सेवांचा लाभ मिळेल आणि महागाईचा परिणाम त्यांच्या खिशावर कमी होईल.

यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.