📍 मुंबई, २५ जुलै २०२५ – Star Pravah serial स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “ठरलं तर मग” आता अतिशय उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. विलास मर्डर केस गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करत होती. आता या खटल्याचा निकाल ३० जुलै रोजी लागणार असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
मधुभाऊंना निर्दोष ठरवण्यासाठी अर्जुन, सायली आणि चैतन्य शर्थीचे प्रयत्न करत आहेत, तर दामिनी देखमुख साक्षीच्या बाजूने शेवटच्या प्रयत्नात गुंतली आहे. कोर्टातील प्रत्येक सीनसाठी कलाकार व तंत्रज्ञांनी महिनाभर मेहनत घेतली असून, कोर्ट प्रक्रियेचं बारकाईने निरीक्षण करून सीन साकारण्यात आले आहेत.
“ठरलं तर मग” (Star Pravah serial)मालिकेचा हा महत्त्वाचा भाग ३० जुलै रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे. विजय कुणाचा? आणि कायद्याच्या चौकटीत कोण अडकणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.