Nashik : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ लाख ६७९८० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क,ब विभाग,पथकाची कारवाई
नाशिक,दि,८ नोव्हेंबर २०२४ – राज्यात १५ ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आलेली असुन त्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोन दुचाकी सह एकुण रक्कम रु. १६७९८०/- किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग नाशिक चे निरीक्षक आर जे. पाटील, दुय्यम निरीक्षक सर्वश्री. धिरज जाधव, जी. जी. अहिरराव, प्रविण वाघ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती सोनाली चंद्रमोरे, श्री विष्णु सानप जवान सर्वश्री. संतोष कडलग, अमित गांगुर्डे, दुर्गादास बावस्कर, महेंद्र भोये तसेच वाहनचालक श्री रॉकेश पगारे यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.
डॉ.विजय सुर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे सो, सह-आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) महाराष्ट्र राज्य मुंबई, नाशिक विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्रीमती. ऊषा वर्मा जिल्हा अधीक्षक. शशीकांत गजें , सु. अ. तांभारे, उप-अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक ब विभागाचे पथकाने दारुबंदी गुन्हयाकामी विविध ठिकाणी देशी व विदेशी मद्याची अवैध विक्री व वाहतुकीबाबत गुन्हे नोंद केलेले असुन त्यामध्ये एकुण ३ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे कडून दोन मोटारसायकल सह अवैध मद्यसाठा ताब्यात घेण्यात आला आहे
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शशिकांत गर्जे यांनी जिल्हयामध्ये आचारसंहिता कालावधीत कोणीही अवैध व्यवसाय करु नये असे आवाहन केलेले असुन अवैध व्यवसाय करणारा विरुध्द येणा-या काळात अजुन कठोर कारवाई करणार असल्याचे निर्देश दिलेले आहेत. अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक, विक्री या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाचे टोल फ्रि क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉटसअॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र ०२५३ २५८१०३३ वर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.