नाशिक – पुणे येथील आर्ट बिट्स या संस्थेच्या वतीने सौरभ अमृतकर यांना ” फोटोग्राफी ” या कला विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला सौरभ ने निर्माण अकॅडमी नाशिक तसेच केटिएचएम महाविद्यालय.नाशिक व्हिडिओ प्रॉडक्शन विभागातून आपले फोटोग्राफी चे शिक्षण पूर्ण केले आहे ,
मागील सहा वर्षापासून फोटोग्राफी क्षेत्रात काम करत आहे एकुण सहा विभागांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात त्यात सौरभ ची निवड करण्यात आली असून फोटोग्राफीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.. या पुरस्कारामुळे सौरभ अमृतकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.