नाशिक,दि.२४ एप्रिल २०२३ – बिल्डर्स असोशियन अॅाफ इंडीया तर्फे काम पूर्ण थकीत देयकांच्या पाठपुरावा आणि अन्य काही मागण्यासाठी आज बिल्डर असोशियनच्या नाशिक शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर ११.०० ते २.०० या वेळात आंदोलन करण्यात आले.
अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता मुंबई येथे मिटींग करीता गेलेले असल्याने त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या ..
१)मार्च २०२३ पर्यंतची सर्व ठेकेदारांच्या थकीत बिलाची संपूर्ण रक्कम त्वरीत अदा करावी
२) मार्च २०२३ पर्यंतची सर्व बिले अदा झाल्यानतंरच पुढील बिले अदा करावीत.
३) शासनाकडे निधी नसेल तर नवीन निविदा काढण्यात येऊ नयेत.
या प्रसंगी बिल्डर्स असोशियन अॅाफ इंडीया नाशिक सेंटरचे अध्यक्ष विजय बाविस्कर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, नासिक बी ए आय चे माजी अध्यक्ष अभय चोक्सी, राहूल सुर्यवंशी,उपाध्यक्ष मनोज खांडेकर, सचिव प्रशांत सोनजे, राजेंद्र मुथा, विलास निफाडे, रमेश शिरसाठ, गजानन काटकर, सुधाकर मुळाणे, मदन जगोटा, जितूभाई शहा, भाऊसाहेब सांगळे, राजूशेठ गोठी, राजाभाऊ कुर्हाडे, संदीप दरगोडे व इतर संघटनाचे पदाधिकारी हजर होते