राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे शुक्रवारी येवल्यात होणार जल्लोषात स्वागत
नाशिक ते येवला दरम्यान ठीक ठिकाणी होणार जंगी स्वागत
नाशिक,येवला,दि.१३ जुलै २०२३ –राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ना.छगन भुजबळ हे प्रथमच येवला दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागताची जैय्यत तयारी करण्यात आली असून मोठ्या जल्लोषात त्यांचे येवल्यात स्वागत करण्यात येणार आहे.
ना.छगन भुजबळ हे दि.१४ जुलै रोजी दुपारी १ वाजता नाशिकहून येवल्याच्या दिशेने रवाना होणार आहे. दुपारी १.३० वा. चांदोरी, १.४५ वा. पिंपळस, २ वा. निफाड,२.१५ वा.नैताळे, २.२५ वा.बोकडदरे, २.३५ वा.विंचूर,२.५० वा.भरवस फाटा, ३ वा. देशमाने, ३.१० वा. मुखेड, ३.१५ वा. जळगाव नेऊर, ३.२० वा.एरंडगाव, ३.२५ वा. रायते, ३.३० वा. अंगणगाव येथे त्यांचे जल्लोषात स्वागत होणार असून त्यानंतर अंगणगाव ते येवला संपर्क कार्यालयापर्यंत भव्य रैली काढण्यात येणार आहे. या दरम्यान ते येवला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतील.