सातपूर परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

0

नाशिक – सातपूरच्या अशोकनगर भागातील रहिवासी परिसरात सकाळपासून ठाण मांडून असलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला वनविभागाने बेशुद्ध करुन जेरबंद केले आहे.

आज शनिवारी सकाळच्या सुमारास अशोकनगर परिसरात विकास काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाथरूमवर (बाथरुमच्या पोटमाळ्यावर) या बिबट्याने ठाण मांडले होते. ही घटना शेजारीच असलेले माजी सभापती योगेश शेवरे यांच्या निदर्शनास आल्याने शेवरे यांनी वनविभागाला कळविले होते. घटनास्थळी वनविभागची रेस्क्यू टीम दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेऊन परिसरात नाकाबंदी केली होती.

सातपूर अशोकनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वस्तीत सकाळपासून बिबट्या बसलेला असल्याने या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. तीन तास बिबट्या एकाच जागेवर बसून असला तरी दाखल झालेले कर्मचारी त्याला पकडण्यासाठीच्या सर्व उपाययोजना केल्या . वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात जाळ्या लावल्या.तर बिबट्या असलेल्या घराच्या चारही बाजूंनी सापळा रचला आहे.अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.