नाशिक छायाचित्रकार संघटनेतर्फे “सिनेमॅटिक व्हिडिओ वर्कशॉप”चे यशस्वी आयोजन

0

आजचा रंग -पिवळा 
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये) 

Pooja Gore vartak
पूजा गोरे -वर्तक (अभिनेत्री)

नाशिक,दि. १९ ऑक्टोबर २०२३ – दोन दिवसीय सिनेमॅटोग्राफी व्हिडिओ वर्कशॉप चे उद्घाटन नाशिक जिल्हा माहिती अधिकारी मा. श्री. विलास बोडके व प्रसिद्ध मेन्टाॅर जागतिक पातळीवरील छायाचित्रकार रंजन झिंगाडे सर आणि नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप व सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते फित कापून सिमिनारचे उद्घाटन व कॅमेरा पुजन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. विलास बोडके यांनी एक फोटो हजार शब्दांनाच्या बरोबर असतो आणि नाशिक छायाचित्रकार संघटना नेहमी छायाचित्रकारांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि फोटोग्राफी संदर्भातील आधुनिक उपयुक्त कार्यक्रम नेहमीच आयोजित करित असते हे आम्ही नेहमी बघत असतो असे गौरवोद्गार काढले

या वर्कशॉप साठी महाराष्ट्रातून नाशिक सह विविध जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवला.या दोन दिवसाच्या वर्कशाप मध्ये आजचे व्हिडिओग्राफीतील जागतिक पातळीवरील प्रगत तंत्रज्ञानाची सखोल माहिती रंजन झिंगाडे सर देणार आहे.कॅमेरा, माॅडेल, लाईट, जिम्बल सह वेडिंग सिनेमॅटोग्राफी प्रात्यक्षिकासह शिकवले

नविन आलेल्या मिरर लेस कॅमेरा वापरा संदर्भातील सखोल ज्ञान बारकाव्या सहित शिकवले जाणार आहे त्यांच प्रमाणे यासाठी आवश्यक प्रकाशयोजना सुद्धा प्रात्यक्षिकासह शिकवली जाणार आहे आधुनिक काळात वेंडिग व फंक्शन फोटोग्राफी मध्ये जगात ज्या ज्या काही प्रगत व नाविन्यपूर्ण असलेल्या विषयाची जवळून ओळख करून देण्यात येणार आहे हे दोन दिवसीय वर्कशॉप नाशिक छायाचित्रकार संघटनेच्या माध्यमातून अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे याचा लाभ जिल्हा व जिल्हयाबाहेरील छायाचित्रकार बंधु घेत आहे याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी मा. श्री. विलास बोडके, प्रसिद्ध मेन्टाॅर व प्रशिक्षक श्री रंजन झिंगाडे सर, संघटनेचे अध्यक्ष मा संजय जगताप, सह सेक्रेटरी नंदु विसपुते, किरण टाक, प्रियाल खोडे, गणेश शिरसाठ, दिपक निकम, राज चौधरी, निलेश सोनवणे, भुषण जोशी, प्रताप पाटील, प्रशांत तांबट,कैलास निरगुडे, जिल्हा माहिती कार्यालय कॅमेरामन पांडुरंग ठाकुर, छायाचित्रकार मनोज आहिरे आदि उपस्थित होते ..

तर यावेळी सेटसक्यु सिटी प्रि-वेंडिग स्टुडिओ इगतपुरी चे संचालक किरण डोंगरे यांच्या वतीने डिस्काउंट कूपन उपस्थित छायाचित्रकारांना देण्यात आले..हे वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकार नंदु विसपुते, किरण मुर्तडक, प्रशांत तांबट, प्रताप पाटील, सौरभ अमृतकर, रविंद्र गवारे, संदीप भालेराव , तुकाराम गांगुर्डे , महादेव गवळी आदिने परिश्रम घेतले .अध्यक्ष संजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले तर नंदु विसपुते यांनी सूत्रसंचालन केले..

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.