सुला वाईनच्या आयपीओ ला १२ डिसेंबर पासून सुरुवात

0

विश्वनाथ बोदडे, शेअर बाजार तज्ञ,नाशिक
नाशिक,१० सप्टेंबर २०२२ – सुला वाईन कंपनीचा आयपीओ येत्या सोमवार दिनांक १२ डिसेंबरला सुरू होत असून बुधवार १४ डिसेंबरला याची शेवटची तारीख आहे.
कंपनी ९६० करोडचा आयपीओ बाजारामध्ये घेऊन आलेली आहे.आयपीओ ची किंमत ३४० ते ३५७ अशी ठेवण्यात आलेली असून गुंतवणूकदार एका लॉटला ४२ शेअर साठी एप्लीकेशन करू शकणार आहेत.सुला वाईन मार्केट लीडर असल्यामुळे आपण ह्या कंपनीच्या आयपीओ मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे जाणकारांचे मत आहे.

नाशिक आणि परिसर हा द्राक्षांची शेती करण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे याचमुळे येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात फळे भाज्या व त्याचप्रमाणे द्राक्षांचे उत्पादन करत असतात.
श्री राजीव सामंत हे व्यक्तिमत्व एक उच्च सुशिक्षित विदेशात शिक्षण घेतलेले परंतु देशाशी व जमिनीशी नाळ जुडलेले असलेले व्यक्तिमत्व आहे, त्यांनी १९९९ मध्ये नाशिक मध्ये एक प्लांट सुरू केला त्याला नाव दिले सुला वेनियार्ड,

सूलाची सुरुवात २००० मध्ये झाली सुरुवातीला काही ठराविक ब्रँड निर्मिती बरोबर लॉन्च करण्यात आले, २००९ मध्ये सुला हा एक मार्केट ब्रँड बनला, त्याचबरोबर २०१२ मध्ये वाईन इंडस्ट्रीमध्ये संपूर्ण भारतामध्ये पन्नास टक्के शेअर असलेली कंपनी बनली.नाशिकचे नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी सुलाचा काही प्रमाणात वाटा आहे कारण जेव्हाही आपण विदेशामध्ये फिरण्यास जात असतो तर तेथील रेस्टॉरंट मोठ्या हॉटेलमध्ये सुला वाईंचे ब्रँड उपलब्ध असतात.

२०२३ सुलाच्या च्या आर्थिक अहवालानुसार २८ टक्के मार्जिन दर्शवलेली आहे त्यामुळे सुलाची बॅलन्स शीट चांगले चित्र दर्शवत आहेत सुला जागतिक स्तरावर आपले नाव कोरण्यामध्ये यशस्वी ठरलेली कंपनी आहे.सध्या मोठ्या शहरांमध्ये वाईन कडे आकर्षित होण्याचे प्रमाण महिला व तरुणांमध्ये वाढलेले दिसत आहे, वाईन ही द्राक्षापासून बनत असल्यामुळे त्यापासून विविध प्रकारचे उपयुक्त घटक असे शरीराला मिळत असतात अशी सुद्धा चर्चा जे लोक हे सेवन करतात ते ते करत असतात.सुला वाइन वाईन बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल हे सर्व शेतकऱ्यांकडून घेत असतात त्यामुळे त्यांना मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेन व इतर खर्च जाऊन मार्जिन मिळत असते.

To Apply for this IPO click here: https://bit.ly/3ElQL7V
मोबाईल 88 88 280 555

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!