नाशिककरांना आपल्या आवडत्या कलावंताना भेटायची संधी !
सन मराठीचा 'मेळा मनोरंजनाचा' कार्यक्रमाचे आयोजन : मनोरंजन होणार दमदार,
मुंबई –सन मराठी निर्मित ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम शनिवार , ४ जून २०२२ रोजी नाशिक येथे दादासाहेब गायकवाड सभागृहात संध्याकाळी ३.३० वाजल्यापासून साजरा होणार आहे. सन मराठीवरिल आपले आवडते कलाकार तसेच मराठी मनोरंजन विश्वातील तारे तारका नाशिक च्या रंगमंचावर अवतरणार आहेत.
सन मराठीच्या ह्या मेळ्यात मनोरंजनाशिवाय नाशिककरांना मिळणार चविष्ट पदार्थांची मेजवानी, खूप सारे खेळ खेळण्याची आणि आपल्या लाडक्या कलाकारांसह सेल्फी काढण्याची संधी. ह्या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना मानसी नाईक, धडाकेबाज अभिनेता पुष्कर जोग, आघाडीचा लावणी किंग- कोरिओग्राफर आशिष पाटील यांचे दमदार परफॉर्मन्सेस. याशिवाय अशोक फळदेसाईसह सन मराठी वाहिनीवरून सादर होणाऱ्या सुंदरी, कन्यादान, नंदिनी, जाऊ नको दूर बाबा, आभाळाची माया, तसेच नव्याने सुरू झालेल्या ‘माझी माणसं’ या मालिकेतील कलाकार नाशिककरांच्या भेटीसाठी येणार आहेत.
याशिवाय आपल्या मनोरंजनासाठी येणार आहेत स्टँड अप कॉमेडीयेनस आणि प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत मेघना एरंडे आणि अंशुमन विचारे. तसेच नाशिक मधील आपले हक्काचे काही कलाकार ही आपली कला सादर करणार आहेत.याशिवाय आपल्या मनोरंजनासाठी येणार आहेत स्टँड-अप कॉमेडीयन्स आणि प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत मेघना एरंडे आणि अंशुमन विचारे. तसेच नाशिक मधील आपले हक्काचे काही कलाकार ही आपली कला सादर करणार आहेत.
कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या सन मराठी ह्या वाहिनीने सुरवातीपासूनच आपल्या प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांत आणि गावागावांत जाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. मेळा मनोरंजनाचा हा कार्यक्रमदेखील ह्याच उपक्रमाचा एक भाग आहे.
सन मराठी ह्या वाहिनीवर प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका संध्याकाळी ७ ते रात्री १०. ३० ह्या वेळेत पाहायला मिळतील. सन मराठीवर संध्याकाळी ७ वाजता ‘आभाळाची माया’, ७.३० वाजता ‘जाऊ नको दूर… बाबा!’, ८ वाजता ‘माझी माणसं’, ८.३० वाजता ‘कन्यादान’, रात्री ९ वाजता ‘संत गजानन शेगावीचे’, ९. ३० वाजता ‘नंदिनी’ तसेच रात्री १० वाजता ‘सुंदरी’ ह्या मालिका दाखविल्या जातात.
सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.