सुनिता विल्यम्सचं सुखरूप आगमन,९ महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या

फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग: पाऊल टाकताच डॉल्फिन्सचा गराडा

0

 

मुंबई,दि,१९ मार्च २०२५ – गेल्या वर्षी ५ जून २०२४ रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झालेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर अखेर ९महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (१९मार्च) पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. हे दोघंही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत.यांच्यासोबत, क्रू-९ चे इतर दोन अंतराळवीर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील पृथ्वीवर परतले आहेत.फ्लोरिडामधील टालाहसीच्या किनारपट्टीवर हा स्प्लॅशडाउन झाला. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओही जारी केला आहे. त्यांचं कॅप्सूल समुद्रात उतरताच चारही बाजूंनी डॉल्फिन्सनी गराडा घालत त्यांचं अनोखं स्वागतही केलं.अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे.

 

सुनीता विलियम्स यांचा 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक-
नासाच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे घालवली अर्थात ९ वेळा स्पेसवॉक केले. तसेच सुनीता विल्यम्स यांनी, ‘अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला’ म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती मिळत आहे.

5 जूनला सुनीता विल्यम्स गेल्या होत्या अंतराळात-
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी ५ जून २०२४रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या. दोघांचाही हा प्रवास केवळ ८ दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, नासाला स्टार लाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले.

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळवीरांचे SpaceX कॅप्सूल बुधवारी (19 मार्च, 2025) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आखातात पॅराशूटद्वारे उतरले. फ्लोरिडामधील टालाहसीच्या किनारपट्टीवर हा स्प्लॅशडाउन झाला. अंतराळ संस्था नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओही जारी केला आहे. नासाने शेअर केला व्हिडीओ या पुनरागमनासंदर्भात नासाने एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला. स्पेस स्टेशनवरून परत आलेल्या चारही  अंतराळवीरांनी अभिवादनही केलं. यासंदर्भात नासाने चारही अंतराळवीरांचा पृथ्वीवर लँडिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसत आहेत. “पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला पहायला मिळत आहे! आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूची मदत करतील. दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली ही एक मानक प्रक्रिया आहे,” असे नमूद केलं.

पाऊल टाकताच डॉल्फिन्सचा गराडा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!