नाशिक,दि.१८ मे २०२४ –विश्वास ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे,शाखा जलालपूर व नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार, १९ मे २०२४ रोजी सकाळी ७:०० वाजता अमृता जाधव-जोशी यांचे गायन होणार आहे.रसिक कुलकर्णी (तबला) व संस्कार जानोरकर (संवादिनी) हे त्यांना साथसंगत करणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.स्मिता मालपुरे या करणार आहेत.
मैफिलीचे हे अडतीसावे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर,सावरकरनगर,गंगापूर रोड,नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सौ.अमृता जाधव- जोशी यांचे गायनाचे प्राथमिक शिक्षण सौ.शिवानी मारुलकर-दसककर याच्याकडे झाले. त्यानंतर पंडिता डॉ. अलका देव मारुलकर यांच्याकडे समग्र गायकीचे शिक्षण घेतले. सध्या विदुषी. मंजिरी असनारे-केळकर यांच्याकडे गायकीचे शिक्षण घेत आहेत.संगीत विषयात बी.ए.व एम.ए.या पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत.त्यांनी एस.एन.डी.टी मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळविले आहे. त्याच प्रमाणे अनेक सांगितिक मैफिलीमध्ये सादरीकरण करत असतात.त्यांना अनेक संगीत व गायन स्पर्धामध्ये पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.
सदर कार्यक्रमास विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,नाशिक,रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ,विश्वास टर्फ,ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले आहे.तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर,ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.