स्वर दीपावली मधून स्वरांची अभिजात आनंददायी बरसात

0

नाशिक,२२ ऑक्टोबर २०२२ (प्रतिनिधी) – स्वरांचे दीपावलीच्या आनंदात द्विगुणित करणारे स्वर आणि जीवन जगण्याचे तत्व सांगणारे शब्द स्वरातुन निथळत होते.मानवी नाती आणि उत्सव यांचे अनोखे मैत्र उलगडून दाखवणारी ही मैफल रसिकांना आनंदी क्षणांची भेटच होती. मैफिलीला पाचशे हून अधिक रसिकांची तुडूंब गर्दी आणि अभूतपूर्व प्रतिसाद हे या मैफिलीचे यश म्हणावे लागेलविश्वास ग्रुप तर्फे सुरविश्वास ‘स्वर दीपावली’ या मैफिलीचे आयोजन विश्वास गार्डन येथे करण्यात आले होते  . दिवाळीचा आनंद स्वरांसोबत साजरा   करण्यासाठी विश्वास ग्रुपतर्फे अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले.

सुप्रसिद्ध गायक पंडित डॉ. अविराज तायडे, ज्ञानेश्वर कासार, मधुरा बेळे यांचे गायन  नव्या पिढीतील क्षितिजा शेवतकर (सतार) व राजेश्वरी रत्नपारखी (बासरी) यांची फ्युजन जुगलबंदी रंगली त्यांना नितीन वारे (तबला), नितीन पवार (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी) व पार्थ शर्मा (गिटार) ,प्रसाद भालेराव ,(तालवाद्य) ओंकार कडवे (तानपुरा ) यशवंत केळकर (तानपुरा) आर्या गायकवाड (गायन साथ) यांनी साथसंगत केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे  यांनी केले

मैफिलीचे हे एकोणीसावे पुष्प होते विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.

अविराज तायडे यांनी मैफिलीची सुरुवात राग बैरागी भैरव ने केली ,बडा ख्याल व शब्द होते पियाके घर आणि त्यानंतर छोटा ख्याल.सावरीया घर नही. आये. प्रेम ,भक्ती, आसक्ती यांची हळवी जाणीव आर्ततेने त्यांनी सादर केली,प्रेमातील शुद्धता आणि  समर्पण याचे दर्शन त्यातून समोर आले.त्यानंतर बैरागी भैरव रागावर निर्गुणी भजन सादर केले ‘ मन रे पढ हरिनाम की गीता ‘ ईश्वर भक्ती ही जीवन जगण्याचा सकारात्मक मार्ग सांगते याचा हा स्वरमंत्र होता.

Sur Vishwas : Swara Diwali brings out the Happyness of Swara

ज्ञानेश्वर कासार यांच्या स्वरातून ‘ओंकार स्वरुपा ‘ चे सुर भक्तीचा मना मनात मळा फुलवणारे होते,परमेश्वर भक्तीची हाक प्रत्येकाला आपली वाटणारी होती.या गीतानंतर.भूपेश्री रागावर आधारित निर्गुणी भजन सादर केले. हिरना समझबुझ. ही रचना सर्वांना भिडणारी होती.मधुरा बेळे यांनी तरल स्वरातून अभंग रचना सादर केल्या ,त्यात सुरुवातीला राग तोडीवर  आधारित नाट्यपद म्हटले, सोहम हर डमरू हे शब्द होते.त्यानंतर राग ललत वर आधारित ‘ समाधी हरिची अभंगाचे गायन केले.

मैफिलीचा शेवट  क्षितिजा शेवतकर ( सतार) व राजेश्वरी रत्नपारखी ( बासरी ) यांच्या फ्युजन ने झाला.विविध रागातील सहजता आणि त्यातून निघणारी सुरेल जुगलबंदी वाद्य संगीताची सुरेल अनुभूती होती.

सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, ग्रंथ तुमच्या दारी, ग्रंथ तुम्हारे द्वार , आर्क ऑडिओ.यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

Ankush Pawar

विश्वास ग्रुप चे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर म्हणाले की ,रसिकांची मिळणारी दाद ही कायमच कलावंताला बळ देणारी असते,त्यातून कलावंताची कला लोकाभिमुख होते तोच विचार या मैफीलीमागे आहे.

कलावंतांचा  व कार्यक्रमास सहकार्य करणारे  विपुल पाठक ,डॉ देवेंद्र चौधरी यांचा सन्मान ॲड.अविनाश भिडे,डॉ.शंकर बोऱ्हाडे,प्राचार्य दर्शना देसाई,कवी ,नरेश महाजन,विवेक केळकर,घनशाम येवला,रमेश देशमुख,नितीन महाजन,एम एम पाटील, डॉ.नलिनी बागुल,डी जे हंस वाणी, डॉ.स्वाती भडकमकर,ज्योती ठाकूर, आर डी मोरे यांचे हस्ते करण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.