स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’कवितासंग्रहात पावसाचे अद्वैत -मकरंद देशपांडे
स्वानंद बेदरकर यांनी पावसाच्या जलधारेतून केली भावनांची आणि अस्तित्वाची रेखाटनं
पुणे, दि.१९ जून २०२५ — swanand bedarkar poems,“कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती जगण्याची अनुभूती असते. स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ या नव्या कवितासंग्रहात पावसाच्या माध्यमातून मानवी अस्तित्वाचे आणि सर्जनशीलतेचे अद्वैत प्रकट होते,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार मकरंद देशपांडे यांनी केले.
‘पावसाच्या गर्भतळी’ या संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी देशपांडे बोलत होते. कार्यक्रमात व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, “पाऊस सृष्टीला स्वच्छ करून नवसृजनासाठी जमिन तयार करतो. तशीच भूमिका बेदरकरांच्या कवितेतील पावसाची आहे. माणसाच्या भावविश्वातील निर्मिती, कविता ही निर्मिती आणि निसर्गातील सर्जनशीलता या तिन्ही घटकांचा एकात्म अनुभव या कवितांतून मिळतो. त्यामध्ये अपूर्व अद्वैताची अनुभूती आहे.”
ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे यांनी सांगितले, “बेदरकर यांच्या कवितांमधील पाऊस हा केवळ बाहेर पडत नाही, तर तो व्यक्तीच्या अंतरंगातही भिजतो. हा अंतरंगातील पाऊस त्यांनी नेमकेपणाने शब्दबद्ध केला आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मिलिंद जोशी यांनी जलतत्त्वाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत सांगितले, “मानवी जीवनातील सत्तर टक्के अंश पाण्याचा असून, पावसाच्या प्रतीकांतून बेदरकर यांनी सुख-दुःख, स्त्री-अस्मिता, निसर्ग आणि लोकमिथकांचे प्रभावी चित्रण केले आहे. त्यामुळे संग्रह वाचकाच्या मनात खोलवर पोचतो.”
स्वानंद बेदरकर यांनी आपल्या कवितासंग्रहाच्या प्रवासाविषयी अनुभव कथन करत दोन कविता सादर केल्या. सूत्रसंचालन पियू शिरवाडकर यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ. अरुणा ढेरे, उमा कुलकर्णी, वंदना बोकिल यांच्यासह पुण्यातील अनेक साहित्यिक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
(swanand bedarkar poems)
📘 कवितासंग्रहाचे नाव : पावसाच्या गर्भतळी
🖋️ कवी : स्वानंद बेदरकर
[…] २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता कुसुमाग्रज स्मारक येथील ‘विशाखा’ सभागृहात पार पडणार […]