नाशिक,१८ सप्टेंबर २०२२ – नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात आज झालेल्या नासा टीव्हीएस एनटॉर्क नासा मान्सून स्कूटर रॅलीचा सर्वसाधारण विजेता सय्यद असिफ अली ठरला आहे . मुसळधार पाऊस आणि स्पर्धात्मक रस्ता अशा आव्हानात्मक परिस्थितीत झालेल्या नासा टीव्हीएस एनटॉर्क नासा मान्सून स्कूटर रॅलीत सर्व स्पर्धकांची कसब पणाला लागलेली होती .
केव्हज काऊंटी रिसॉर्ट, गोदा श्रद्धा फौंडेशन रेडिओ सिटी , मास्टर एनर्जी ड्रिंक्स प्रायोजित या स्पर्धेचा शुभारंभ विल्होळी येथील केव्ह्ज काऊंटी रिसॉर्ट येथे काल सकाळी ९ वाजता स्कुटर रॅली ला सुरुवात झाली. सारूळच्या दगड खाणी परिघात झालेल्या या स्पर्धेचा आनंद नाशिकच्या युवा मोटर क्रीडा प्रेमींसोबत स्थानिक बांधवांनी मनमुराद लुटला. पुणे येथून आलेल्या दीक्षा श्रीवास्तव या एकमेव महिला स्पर्धक पहिल्याच फेरीत वाहन नादुरुस्त झाल्याने स्पर्धेतून बाद झाली.विजयी स्पर्धकांना सुरेश अण्णा पाटील ,राजारामन , हेमा पटवर्धन ,प्रवीण मराठे ,जोत्स्ना कंसारा व राजवर्धन देवरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले .अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत पुढील स्पर्धकांनी विजय प्राप्त केला .
सर्वसाधारण विजेता
प्रथम सैयद असिफ अली ,
द्वितीय व्यंकटेश शेट्टी ,
तृतीय कार्तिक नायडू .
क्लास ३ स्कुटर २१० सी सी ग्रुप बी :
प्रथम सैयद असिफ अली ,
द्वितीय कार्तिक नायडू ,
तृतीय नीरज वांजळे
क्लास ४ स्कुटर २१० सी सी ग्रुप बी :
प्रथम व्यंकटेश शेट्टी ,
द्वितीय मोहसीन फ़की ,
तृतीय आकाश सातपुते
क्लास २ स्कुटर ८० सी सी ते ११५ सी सी ग्रुप बी :
विजेता हितें ठक्कर
क्लास १ स्कुटर ८० सी सी ते ११५ सी सी ग्रुप बी :
प्रथम निलेश ठाकरे ,
द्वितीय रोहन ठाकूर ,
तृतीय कौस्तुभ मत्से
प्रथमच सहभागी म्हणून तेजस कदम यांना गौरवण्यात आले .