तैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप !जपानकडून त्सुनामीचा इशारा 

इमारती ढासळल्या !पहा थरकाप उडवणारा Video

0

तैवान,दि,३ एप्रिल २०२४ –तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी सकाळी ७:५८ वाजता शक्तिशाली भूकंप झाला असून गेल्या २५ वर्षातील तैवानमध्ये आलेला हा भूकंप सर्वात मोठा मानला जात आहे.या भूकंपाची तीव्रता ही ७.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे. भूकंपा नंतर  त्सुनामीचा येण्याचा इशारा देण्यात आला आहे.वृत्तसंस्था रॉयटर्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले की, तीव्र भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून या भूकंपानंतर लगेचच जपानमध्ये त्सुनामी इशारा देण्यात आला आहे.

तैवानमध्ये मोजण्यात आलेली ७.५ रिश्टर स्केलची तीव्रता धोकादायक श्रेणीत मोडते. तैवान सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननं ही माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तैपेईच्या अनेक भागांत वीज गेली. भूकंपानंतर लगेचच शेजारील देश जपान सतर्क झाला आणि त्सुनामीचा इशारा दिला. लोकांना सखल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यासही सांगण्यात आलं आहे.

भूकंपामुळे तैवानमध्ये जीवित वा मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले आहे की नाही याची माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही. जपान हवामान संस्थेने ३ मीटर (९,८ फूट) पर्यंत त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे. तीव्र भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर लगेचच ओकिनावाच्या दक्षिणेकडील प्रीफेक्चरजवळील किनारपट्टीच्या भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भूकंपाने तैवानच्या पूर्वेकडील हुआलियन शहरातील इमारती कोसळल्या आहेत.तर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. तैपेईमध्येही मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे.राजधानीपासून बेटाच्या दुसऱ्या बाजूला सकाळी ७:५८ वाजता भूकंप झाला, भूकंपमापकावर याची नोंद ७.२ रिश्टर नोंदवल्या गेली.

तैवानमध्ये गेल्या २५ वर्षात आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:५८ वाजता भूकंप झाला.त्याची तीव्रता ७.४ मोजली गेली. त्याचा केंद्रबिंदू बेटाच्या पूर्वेला हुआलियन शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर होता. तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने या घटनेची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ इतकी नोंदवली आहे.

Japan Tsunami Alert

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.