पवार तबला अकादमी तर्फे आज ‘तालाभिषेक बैठक’

0

नाशिक,दि,२९ सप्टेंबर २०२४ –पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाशिककरांसाठी ‘तालाभिषेक बैठक ’ या संगीत मैफिलीचे  आयोजन दर दोन महिन्यांतून एकदा केले जाते.याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला  जवळून अनुभवण्याची संधी  संगीत रसिकांना मिळणार आहे.

या उपक्रमातील सातवी बैठक आज रविवार ,दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायं ६ वा विशाखा सभागृह,कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे आयोजित केली आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी  म्हणून सिंगल विंडो सोल्युशनचे  डॉ. विश्वास पांगारकर  आणि संदीप देशमुख  तसेच महाराष्ट्र सेवा संघाचे सहसचिव पंकज पवार असतील.

या मैफिलीत तालयोगी पं .सुरेश तळवलकर यांचे शिष्य युवा तबलावादक रोहित श्रीवंत  यांचे स्वतंत्र तबलावादन होणार आहे.त्यांचे तबल्याचे  प्रारंभिक शिक्षण वयाच्या आठव्या वर्षी  जळगाव येथे देवेंद्र गुरव यांच्याकडे झाले असून तो पवार तबला अकादमी तसेच  के.के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचा विद्यार्थी आहे.त्यांना ईश्वरी दसककर (संवादिनी ) साथ करतील.

मैफिलीच्या उत्तरार्धात कलकत्ता येथील किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक उ. मशकूर अली खां यांचे गायन होणार आहे. किराणा घराण्याचे संस्थापक उ. अब्दुल करीम खां  यांच्या परंपरेतील गायकी त्यांना वडील पद्मश्री उ. शकूर खां  यांच्याकडून मिळाली. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ए ग्रेड कलाकार असलेल्या खां साहेबांना संगीतनाटक अकादमीचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यांनी कलकत्ता येथील प्रसिद्ध ITC संगीत रिसर्च अकादमी येथे विद्यादानाचे कार्य केलेले असून त्यांचे अनेक शिष्य गायक कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

देश विदेशात त्यांनी अनेक मानाच्या संगीत समारोहात  आपली कला सादर केलेली असून  त्यापैकी  सवाई गंधर्व महोत्सव ,डोवरलेन  महोत्सव ,स्वामी हरिदास संमेलन त्यापकी काही आहेत. त्यांना पं . सुभाष दसक्कर (संवादिनी ) आणि कुणाल काळे (तबला ) साथ करणार आहे .  कार्यक्रमाचे संयोजन  अल्पारंभ एज्युकेशनल  अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . .

तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार  ,एस.डब्ल्यू.एस.फायनान्शिअल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.