मुंबई, दि. २२ जुलै २०२५ – Tarini Zee Marathi Serial झी मराठीवरील प्रेक्षकांसाठी एक सशक्त आणि थरारक कहाणी घेऊन येतेय नवी मालिका – “तारिणी”. ११ ऑगस्टपासून सोमवारी ते शुक्रवारी रात्री ९.३० वा. ही मालिका प्रसारित होणार आहे. एका धैर्यवान तरुणीचा हा प्रवास आहे, जिला तिच्या आईवर लावलेल्या खोट्या आरोपांचा बदला घ्यायचा आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला न्यायासमोर आणायचं आहे.
(Tarini Zee Marathi Serial)“तारिणी बेलसरे” – मुंबईत राहणारी एक हुशार, कणखर आणि जिद्दी मुलगी. तिची आई पोलिस खात्यात हेड कॉन्स्टेबल होती – अतिशय प्रामाणिक, पण तिच्यावर लाचखोरीचे खोटे आरोप लावले गेले आणि समाजाच्या दबावाखाली तिने आत्महत्या केली असा बनाव उभा करण्यात आला. तारिणीला मात्र खात्री आहे की तिची आई कधीही चुकीचं वागत नाही. हाच विश्वास तिला पोलिस खात्यात भरती होण्यासाठी प्रेरणा देतो.
तिच्या या लढ्यात तिच्यासोबत आहे “केदार”, एक अचूक निशाणा साधणारा युवक. तो त्याला आणि त्याच्या आईला टाकून गेलेल्या वडिलांचा शोध घेत आहे. दोघांचेही संघर्ष वेगळे, पण त्यांचा हेतू एक – सत्याचा शोध. केदारच्या मनात तारिणीविषयी प्रेम आहे, पण तो आजवर तिला ते सांगू शकलेला नाही.
या दोघांची कहाणी नवा वळण घेते जेव्हा ते मीडिया टायकून खांडेकरांच्या घरात राहायला जातात. काय आहे त्या घरामागचं गूढ? खरोखरच तारिणीच्या आईच्या खोट्या आरोपांशी या घराचा काही संबंध आहे का? आणि यामुळे केदार आणि तारिणीमध्ये अंतर निर्माण होईल का?
ही मालिका लिहिली आहे प्रल्हाद कुडतरकर यांनी, संवादलेखन पूर्णानंद वांढेकर यांचे आहे आणि दिग्दर्शन आहे भीमराव मोरे यांचे. तर निर्माते आहेत एरिकॉन टेलिफिल्म्सचे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई.
न्याय, संघर्ष आणि नात्यांच्या या प्रवासाला साक्षी राहण्यासाठी पाहायला विसरू नका – “तारिणी” ११ ऑगस्टपासून, सोम-शुक्र, रात्री ९.३० वा. फक्त झी मराठीवर!
[…] […]