राष्ट्रीय अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेसाठी संघ जाहीर

0

नाशिक – येथील महाराष्ट्र इव्हार्मेंट इंजिनिरींग ट्रेनिंग अँड रिसर्च अँकेडमी येथे संपन्न झालेल्या एमपिल नँशनल ब्लिट्झ स्पर्धेद्वारे देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणारा बुद्धिबळाचा संघ निवडण्यात आला. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

अत्यंत कमी वेळेत वेगवान खेळी करत खेळला जाणारा बुद्धीबळाचा प्रकार म्हणून अतिजलद(ब्लीट्स ) हा प्रकार ओळखला जातो.  नाशिक येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत तीन मिनीटे तसेच अधिकचे दोन सेंकद या पद्धतीचा अवलंब करण्यात आला .

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारा बुद्धिबळ संघ पुढील प्रमाणे राष्ट्रीय स्पर्धेत तामिळनाडू कडून प्रतिनिधीत्व करणारे  ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम्. आंध्रप्रदेश कडून प्रतिनिधित्व करणारे ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरमन, पश्चिम बंगालकडून खेळणारे  मित्रभा गुहा, आणि  दिप्तम घोष . या स्पर्धेत या खेरीज 11 खेळाडूंना रोख बक्षिसे देवून गौरवण्यात आले

Team for National Super Speed ​​Chess Tournament announced

तसेच स्पर्धा नाशिकमध्ये होत असल्याने विविध वयोगटातील नाशिकमधील खेळाडूंना विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य पंच  मंजूनाथ, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनील शर्मा,  सुपर ग्रँडमास्टर विदीत गुजराथी यांची आई निकिता गुजराथी आणि बहीण  वेदीका गुजराथी ,इंडियो इंफोलाइनचे सुहास तारे  आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी  सचिन व्यवहारे,जयराम सोनावणे, जयेश भंडारी, विक्रम मावळंकर,विनायक वाडील ,अजिंक्य तरटे, मंगेश गंभीरे,  भूषण ठाकूर ,प्रकाश चव्हाण  भुषण पवार,   आणि संदिप फाउंडेशन आणि आय आरटी महाविद्यालयाच्या  स्वयंसेवक यांनी परीश्रम  घेतले.

आज सकाळी या स्पर्धेचे उदघाटन  नाशिक विभागाचे सह धर्मादाय आयुक्त जयपालसिंग  झपाटे यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी नाशिक जिल्हा बुद्धिबळ  संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, सचिव सुनिल शर्मा, खजिनदार जयेश भंडारी, मुख्य पंच मंजूनाथ, सहाय्यक पंच मंगेश गंभीरे, संदिप फाउंडेशचे स्वयंसेवक , बुद्धिबळ खेळाडू  उपस्थित होते.आपल्या उद्धाटनपर भाषणात प्रमुख अतिथी जयपालसिंग झपाटे  यांनी बुद्धिबळाचे मानवी आयुष्यातील महत्व विशद केले त्यांनी बुद्धीबळामुळे  एकाग्रता वाढते.लहानपणी ते स्वतः बुद्धीबळ खेळत असल्याने त्यांना त्याचा पुढील वाटचालीत प्रचंड फायदा झाला. त्यांची एकाग्रता प्रचंड प्रमाणात वाढली, ज्यामुळे त्यांनी भारतीय संविधान याविषयीच्या विविध स्पर्धांमध्ये अनेकदा यश मिळवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  कार्यक्रमाचे सुत्र संचालन तन्वी किरण यांनी केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.