मुंबई,दि,७ फेब्रुवारी २०२४ –मागील काही काळापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं परखड मत सोशल मीडियावर मांडते आहे.तेजस्विनी पंडित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची समर्थक असल्याचे म्हटले जाते. तिने सामाजिक-राजकीय मुद्यांवर भूमिकांवर घेतलेल्या मुद्यांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा घडते. आता तेजस्विनीने केलेले ट्वीट पुन्हा चर्चेत आले आहे.
जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही असे ट्वीट तेजस्विनीने केले आहे.तिच्या या ट्वीटवरून चर्चा सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट असल्याचे म्हटले जात आहे. तेजस्विनी पंडितने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपले मत मांडले आहे.
तेजस्विनीने आपल्या ट्वीटमध्ये जनता मूर्ख नाही.सगळं जाणते. बेईमानी ओळखते.लक्षात ठेवणे ! असे ट्वीट तिने केले आहे.
जनता मूर्ख नाही.
सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024