राज्यात गारठा वाढला : नाशिक,चिखलठाण येथे सर्वात कमी तापमानाची नोंद 

0

नाशिक,१ नोव्हेंबर २०२२  – राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.पावसानं निरोप घेताच राज्यात थंडी वाढाली आहे.राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची  नोंद नाशिक आणि चिखलठाण येथे झाली आहे. चिखलठाण १२.५ तर नाशिकला १२.६अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन उत्तर भारतापाठोपाठ महाराष्ट्रातील किमान तापमान कमी झालं आहे.

महाराष्ट्रातही परतीचा पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळे सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून,आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. थंडीच्या दिवसात उत्तरेकडे बर्फ पडतो, त्यामुळं तिकडून कोरडे वारे वाहते, यामुळं मध्य भारतात थंडीचा कडाका वाढत आहे.राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे. त्यामुळं तिथे थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानातही घट झाली आहे. दिवसभर उन्हाचा चटका अरी बसत असला तरी रात्री थंडीचा जोर वाढत आहे. कमाल आणि किमान तापमानात विशेष बदल होणार नाही.

गेल्या एका आठवड्यात हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. रात्रीच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. रात्री तापमानातही तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे.पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे. कोकणत देखील थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे – १३.३
चिखलठाण -१२.५
नाशिक – १२.६
जळगाव – १३.७
मुंबई – २०.६
बारामती – १४.१
अहमदनगर- १४.८
परभणी -१४.४
उस्मानाबाद -१३.८
उदगीर -१४.५

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.