झी मराठी वरील ‘नवा गडी नवं राज्य’या मालिकेत हा अभिनेता दिसणार प्रमुख भूमिकेत 

'नवा गडी नवं राज्य' चा भव्य प्रीमियर सोहळा

1

मुंबई – झी मराठीवर ‘नवा गडी नवं राज्य‘ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ८ ऑगस्ट पासून येणार आहे. रमा आणि आनंदीच्या संसाराची गोड गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल. ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अनिता दाते , पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर सोबतच साईशा भोईर असणार आहेत.

झी मराठीने टेलिव्हिजनच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदांच मालिकेच्या निमित्ताने दिव्य प्रीमियर सोहळा मुंबईमध्ये आयोजित केला होता, यावेळी मालिकेचे सर्व कलाकार, तंत्रज्ञ सोबतच मनोरंजन क्षेत्रातील पत्रकार मंडळी देखील ह्या प्रीमियर ला उपस्थित होती. ह्यावेळी अनिता दाते, पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर ह्यांनी आनंद व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या,

“आम्ही ह्या प्रीमियरसाठी खूप उत्सुक होतो कारण मराठी मालिकेचा असा भव्य प्रीमियर होणं हे कदाचित पहिल्यांदाच होत असेल. ह्यासाठी आम्ही व आमच्या सर्व टीमने खूप मेहेनत घेतली. प्रीमियर बघून आम्ही खूप खुश झालो आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमची ही आगळीवेगळी  मालिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच स्थान मिळवेल. तेव्हा पाहायला  विसरू नका ‘नवा गडी नवं राज्य’ ८ ऑगस्टपासून रात्री ९ वा.झी मराठी वर.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] त्याचा वाद होतो. त्याचवेळी पारू हे मंगळसूत्र फक्त एक खोट्या लग्नाचं प्रतीक […]

Don`t copy text!