(हरिअनंत,नाशिक) ८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यन्त धनु,मकर आणि कुंभ राशींच्या व्यक्तींनी अतिशय सावध रहावे.अतिशय मोठा आर्थिक व्यवहार व कर्ज घेऊ नये.आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्तआहे.२३ ऑक्टोबर पर्यन्त शनीची चाल ही वक्री असणार आहे. शनी राशी परिवर्तन करणार नाही तो आपल्या मकर राशीतच राहणार आहे, पण आपली वक्री चाल सोडून शनी मार्गी होणार.इतर सौम्य,शुभ ग्रह जेंव्हा वक्री होतात तेंव्हा ते अतिशय उत्तम फल प्रदान करतात पण शनी ग्रह जेंव्हा वक्री होतो तेंव्हा तो अतिशय कठोर होतो. कठोर होतो म्हणजे त्यावेळी न्याय करण्यात कुठल्याच प्रकारची दया- माया करीत नाही अतिशय कठोरतेने आणि सत्यप्रिय न्याय करतो
अर्थात शनी कुठल्याही प्रकारची हेरफेर पचू देत नाही. निती विरुद्ध, स्वार्थी,अत्याचार करणाऱ्याला शनी शिक्षा केल्याशिवाय सोडीत नाही असा आ पर्यंतचा अनेकांना अनुभव आहे. शनीच्या वक्रीपणाचा परिणाम मेष ते मीन या बारा राशीवर होतो. ही महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवून प्रत्येक राशीच्या व्यक्तीने अतिशय सावधानतेने आणि नीतिने आपला व्यवहार चोख करावा. जाणीवपूर्वक कुणाची नुकसान होईल अशा कार्यापासून स्वतःला तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न करावा .शनी जेंव्हा वक्री असतो त्याकाळी सत्यप्रिय, दनविर, उदार, मायाळू व निस्वार्थी व्यक्तींना शनी उत्तम फल देऊन त्यांचे कल्याण करतो. या विश्वात असलेल्या अति धनवान व्यक्ती शनिप्रभावीत असतात.
शनिग्रहच अति संपत्तीची करून करून देणारा ग्रह आहे. मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करण्यास देखील शनीचीच कृपा असावी लागते.शनीच्या कृपेअभावी धन संपत्तीचेच नव्हे तर विश्वातील प्राणी मात्राच्या प्राणाचे रक्षण होऊ शकत नाही. म्हणून तर शनीला यमाग्रज म्हणतात.
शनिशी संबंधित असलेले व्यापार – त्यात कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, बिल्डींग मटेरियल डीलर,एजेंट, व्यवसाय करणाऱ्यासाठी २०२२-२३,२०२४ पर्यन्त या व्यवसायकांना उत्तमोत्तम फल मिळणार. जमीन खरेदी विक्री करणाऱ्याना अतिशय फायदा होणार. २०२२ ऑगस्ट ते १६ डिसेंबर २०२२ पर्यन्त खरेदी, व्यवहार केलेल्या जमीन,प्लॉट खरेदी केलेल्या प्रॉपर्टी २०२४ मध्ये अतिशय उत्तम भाव प्राप्त करून देणार.
बिल्डिंग स्टील उत्पादन करणारे, डिलर्स याना अतिशय आर्थिक फायदा होणार. रियल इस्टेट एजेंट, लँडडेव्हलपर यांच्यासाठी २०२२, २०२३ अतिशय उत्तम आहे. आधी- मधी येणारे तीन- चार महिने अडचणीचे आहे त्याचे डिटेलिंग पत्रिका व्यवसाय कंपनीचे नाव बघितल्या शिवाय होऊ शकत नाही त्यासाठी आपल्या नेहमीच्या जाणकार व्यक्तीकडून पत्रिका, व्यवसाय नावाचे परीक्षण करावे. वक्री शनीचा मेष ते मीन राशी पर्यंत शनीचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार. मार्गी शनिमुळे कोणत्या राशीचे अडलेली कामे मार्गी लागणार—— ? भाग -१६७ (क्रमशः)
साडेसाती विषयी काय काळजी घ्यावी ? काय सावधानता बाळगावी ? तसेच आजार, व्यवसाय,आणि त्यावरील उपाय. शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर काय उपाय करावे याविषयी सखोल ‘मार्गदर्शन ‘ मिळविण्यासाठी सकाळी ११ ते १ पर्यन्त 9096587586 या नंबर वर संपर्क करू शकता,…हरीअनंत