शिवसेना कुणाची याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार 

0

नवी दिल्ली,२७ सप्टेंबर २०२२ – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे गटाकडून निरंजन कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून निरंजन कौल यांनी युक्तीवाद केला.

शिवसेनेसह बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना कुणाची? असा वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे आणि शिंदे गाटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेनेवर दावा करतानाच निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावण्याचाही शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळली. यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार. आम्ही निवडणूक आयोगाची सगळी प्रक्रीया पुर्ण करू. हा धक्का नाही तर प्रक्रीयेचा एक भाग आहे असे देसाई म्हणाले.आतापर्यंत आम्ही त्यांची प्रक्रीया पुर्ण करत आले आहोत. मात्र निवडणूक आयोग सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुरावे देऊ. आम्हाला पुढच्या सुनावणीत नक्की न्याय मिळेल असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.