‘या’मालिकेत झाली व्यक्तिरेखांची अदलाबदल !

0

मुंबई,३ फेब्रुवारी २०२३ – मालिकेत कथानकानुसार नवनव्या पात्रांची एण्ट्री होत असते. मात्र स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये चक्क व्यक्तिरेखांची अदलाबदल झालीय. साध्याभोळ्या गौरीने धारण केलाय शालिनीचा अवतार तर चलाख शालिनी बनलीय बिचारी गौरी. मालिकेत हा बदल झालाय चिमुकल्या लक्ष्मीच्या सांगण्यावरुन. राजहट्ट आणि बालहट्टापुढे साऱ्यांनाच झुकावं लागतं. त्यामुळे लक्ष्मीच्या इच्छेखातर शिर्केपाटील कुटुंबात बदलाचे वारे वाहू लागलेत.

खरतर जयदीपच्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीचा बराच छळ केला. घराची मालकीण असूनही तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली. मात्र जयदीप आता जयवंत देशमुख हे नवं रुप घेऊन परत आलाय. शालिनीला धडा शिकवण्यासाठी त्याने आणि लक्ष्मीने मिळून हा अदलाबदलीचा डाव आखलाय. त्यामुळे गौरी झालीय शालिनी आणि शालिनी बनलीय गौरी.

खरतर गौरीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा ही प्रेक्षकांची इच्छा होती. त्यामुळे शालिनीला ती शालिनीच्याच रुपात कशी अद्दल घडवणार ते पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं. सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!