बांधकाम क्षेत्रही बदलतयं,उत्तम अ‍ॅमिनिटीज सह नाशिक मध्ये साकारताय पर्यावरण पूरक प्रकल्प-आर्कि संजय म्हाळस

0

नाशिकचा विकास झपाटयाने होतोय तसे बांधकाम क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. पूर्वी नाशिकमध्ये पाच, सात मजली इमारती दिसायच्या आज मात्र दहा, पंधरा, वीस मजली इमारतींनाही परवानगी मिळत आहे. मुंबई, पुण्याप्रमाणे गगनचुंबी इमारती नाशिकमध्ये उभ्या राहू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘वन’ ‘टू’ बीएचके प्रमाणेच आता ‘थ्री’, ‘फोर’, बीएचके, ‘वन फ्लोअर वन फ्लॅट’ ला देखील ग्राहक पसंती देऊ लागले आहेत. तसेच गृह प्रकल्पातील अ‍ॅमिनिटीजलाही तेवढेच महत्व ग्राहक देऊ लागले आहेत.

सदनिकांच्या बदलत्या क्षेत्रफळामध्ये नाशिकमधील प्रगतीशील सुबकतेचे प्रतिबिंब दिसते. त्याबरोबरच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गृहरचना व सुशोभिकरणामधे सुध्दा खूप प्रगती झाली आहे. आता प्रशस्त गार्डन, जिम, मंदिर वगैरे कॉमन आहेत. त्याबरोबरच भव्य प्रवेशद्वारे, भव्य लॉबी व त्यांचे आकर्शक डेकोरेशन अनिवार्य झाले आहे. कॉमन एरीया मधील सुखसोई मध्ये खूप वाढ झाली आहे. जिने, पॅसेज व त्यांचे फलोअरिंग यांमध्ये सुधारणांची भर पडली आहे. हवा, सूर्यप्रकाश व पर्यावरण पूरकता यांचा उपयोग वाढला आहे. कॉमन टेरेस मधे सुख-सुविधा अधिक देण्याची स्पर्धा आहे, बाहेरुन इमारत देखणी दिसणे अनिवार्य झाले आहे.

यासोबतच रिक्रिएशन सेंटर, स्वीमिंग पूल, ओपन पार्क्स, सुरक्षा यंत्रणा, उत्तम सोय पार्किंग फॅसिलिटीज या अतिरिक्त सुखसोयींना देखील महत्व आले आहे. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांनीही नागरिकांच्या या आवडी अन गरजा लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनीही वास्तू रचनेत बदल केले आहेत. सुबकता, उत्तम रंगसंगती यांचा वापर झाल्याने सर्वसाधारणपणे, एखाद्या प्रकल्पाची वास्तूरचना आता अधिक प्रशस्त झाल्याचे दिसते. वाढत्या प्रदुषणाचा विचार करून शहराचे पर्यावरण अबाधित राखण्यासाठी ग्रीन बिल्डिंग संकल्पना पुढे आली आहे. त्यानूसार आता बांधकाम व्यावसायिकही पर्यावरण पूरक प्रकल्प साकारण्याकडे विशेष भर देत आहे. ज्याव्दारे एक उत्तम जीवनशैलीचा अनुभव मिळू शकतो.
आर्कि, संजय म्हाळस सल्लागार, नरेडको, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.